25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारणव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने बांगड्या फोडणारे काँग्रेसी दुतोंडी व बेशरम

व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने बांगड्या फोडणारे काँग्रेसी दुतोंडी व बेशरम

Google News Follow

Related

युपीए सरकारच्या काळामध्ये तब्बल ९,००० फोन्स आणि ५०० मेल्स टॅप केले गेले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकारांतर्गत केलेल्या याचिकेतून ही माहिती मिळाली आहे. मोदी सरकारवर फोन टॅप केल्याचा आरोप होत असतानाच ही अतिशय संतापजनक माहिती कळली आहे. यासंदर्भात भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट करून विरोधकांना दुतोंडी आणि बेशरम म्हणत सडकून टीका केली आहे.

“२०१३ सालच्या आरटीआयमधून उघड झालेल्या  माहितीनुसार यूपीए सरकार दरमहा ९००० फोन, ५०० ईमेलवर हेरगिरी करत होतं. ऊठल्या बसल्या व्यक्तिस्वातंत्र्यावरून मोदी सरकारच्या नावाने बांगड्या फोडणारे काँग्रेसी आणि सर्व विरोधक किती दुतोंडी व बेशरम आहेत याचा प्रत्यय येतो.” असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

प्रसनजित मोंडल यांनी केलेल्या माहिती याचिकेवर उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या उत्तरात हा खुलासा केला होता. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ६ ऑगस्ट २०१३ रोजी उत्तर देण्यात आले होते. या उत्तरामध्ये सांगण्यात आले होते की सुमारे ७,५०० ते ९,००० टेलिफोन आणि ३०० ते ५०० मेल अडवून टॅप करण्याचे आदेश देण्यात आले होते.

हे ही वाचा:

युपीए काळात टॅप केले गेले तब्बल ९,००० फोन

कुठे गेले अनिल देशमुख?

…हे तर मुंबईवर बेतलेल्या संकटाचे संकेत

भरदिवसा वकिलावर तलवारीने वार; दहिसरमध्ये कायदा सुवस्थेचे तीन तेरा!

धक्कादायक गोष्ट म्हणजे सुमारे ९,००० फोन टॅप केले गेले होते. यामध्ये सामान्य नागरिकांसोबत काँग्रेसच्या जवळच्याच काही लोकांचा समावेश होता. अनेकांनी यावरून सरकारवर टीका देखील केली होती. विरोधी पक्षातील सिताराम येचुरी, जयललिता, सी बी नायडू, इत्यादी नेत्यांनी देखील याप्रकारची टीका केली होती. या प्रकारची टीका झाल्यानंतर त्यावरून संसदेमध्ये वादळी चर्चा झाली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा