उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार सुरु असून राजकीय पक्षांच्या आरोप- प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील आरोप करत थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशमधील एका प्रचार सभेत बोलताना ओवैसी म्हणाले की, एका घोटाळ्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे आझम खान हे तुरुंगात आहेत पण तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव का बाहेर आहेत? तसेच महाराष्ट्रात चित्र आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक तुरुंगात आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचेच उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र सिंचन घोटाळ्याचा आरोप असतानाही बाहेर का आहेत? हे काय सुरु आहे? असे सवाल त्यांनी विचारले आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडे युक्रेनचे मदतीसाठी साकडे
‘मराठी भाषा जाती- पातीत अडकून राहू नये’
आंतरराष्ट्रीय तिरंदाजाची उपसंचालक चोरमलेंविरोधात विनयभंगाची तक्रार
हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वा. सावरकरांचा विसर
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ माजली आहे. त्यावरूनच ओवैसी यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. एकाच पक्षातील नेत्यांना वेगळा न्याय यावरून त्यांनी या प्रचार सभेत भाष्य केले.







