27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरराजकारणनाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

Google News Follow

Related

गलथान कारभाराचा मोठा फटका

आधीच महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असताना आणि ऑक्सिजनसाठी बाहेरच्या राज्यांतून ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजनचे टँकर आणले जात असताना नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ऑक्सिजनच्या भल्यामोठ्या टाकीतून गळती झाल्याने काही रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गलथान कारभाराचा गंभीर प्रकार या घटनेमुळे उघडकीस आला आहे. रुग्ण दगावले आहेत की नाही यासंदर्भात अधिकृत माहिती कळलेली नाही. ही गळती झाल्यामुळे पंपिग करून रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न करावा लागण्यापर्यंत वाईट परिस्थिती ओढवली. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस इतर आरोग्य कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांना धावपळ करून रुग्णाला वाचविण्याची धडपड करावी लागली.

दुपारी १२.३०वाजता ही गळती सुरू झाली आणि अर्धा तास ही गळती सुरू होती. या हॉस्पिटलमध्ये जवळपास ६७ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होत असतानाच ही गळती झाल्याने त्यातील अनेक रुग्ण अत्यवस्थ झाल्याचेही कळते. १७१ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. या सगळ्या रुग्णांची अवस्था या गळतीमुळे वाईट बनली.

हे ही वाचा:

जमत नसेल तर पालकमंत्री पद सोडा

शरद पवारांवर पुन्हा शस्त्रक्रिया

कोरोनाच्या पार्शवभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केवळ तातडीच्या केसेसवरच सुनावणी होणार

पाकिस्तानमध्ये ‘या’ कारणामुळे हिंसाचार सुरूच

येथील अग्निशमन दलाने ताबडतोब कारवाई करत ही गळती रोखण्याचा प्रयत्न केला आणि अर्ध्या तासाने त्यांना त्यात यश आले. गळती झाल्यानंतर मात्र तिथे भयानक वातावरण तयार झाले. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनीही तिथे धाव घेतली. या गळतीमुळे द्रवरूपातील शेकडो लीटर ऑक्सिजन वाया गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र या घटनेत रुग्ण दगावलेले नाहीत, असे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असल्याचेही ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा