29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारण'एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील'

‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’

Google News Follow

Related

तुम्ही सरकारचे बाप निघालात डगमगायला तयार नाही. विलिनीकरण करण्यावर तुम्ही ठाम राहिलात. सरकार आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण एसटी कर्मचारी मागे हटणार नाही. आता परिवहन मंत्री अनिल परब यांना भाऊबीज देण्याचा कार्यक्रम करणार आहोत. महिला परबसाहेबांचा साडी चोळी आणि नारळाने ओटी भरणार आहेत. त्यासाठी चार वाजता सर्व महिला परब यांच्या बंगल्यासमोर जमतील. हा कार्यक्रम चार वाजता होईल, अशी घोषणा भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात केली.

त्यांनी आंदोलकांसमोर महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारला आता काहीही सूचत नाही. कुणाबरोबर बोलायचे असे राज्य सरकारमधील नेते म्हणतात. अहो एसटी कर्मचाऱ्यांशी बोला. विलिनीकरणाचीच मागणी आहे. वेगळे काय बोलायचे आहे? खरं तर,  भ्रष्टाचार थांबवला तरी कर्मचाऱ्यांचा पगार मिळेल. सरकार आंदोलनात फूट पडू इच्छित आहे. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत झाला पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून आंदोलन सुरू आहे. डोळे उघडे ठेवून बघा प्रत्येक एसटी डेपोचा प्रतिनिधी इथे आहे. एक एक लाख कर्मचारी तुमच्या कानाखाली वाजवतील तेव्हा सराकरचे डोके ठिकाणावर येईल.

 

हे ही वाचा:

मालिकेवर भारताचा शिक्का! हर्षल पटेल चमकला

डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?

कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता

गोव्याची ओळख महागात पडली, कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅप मध्ये

 

गेले काही दिवस महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे सरकार आता विविध मार्गांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी जवळपास दोन हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. रोजंदारीवर असलेल्यांना कर्मचाऱ्यांची सेवाही एसटी महामंडळाने समाप्त केली आहे. नव्याने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा इशाराही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला आहे. राज्यातील विविध बस डेपो बंद करण्यात आले आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. शिवाय, कर्मचाऱ्यांचे वेतनही तुटपुंजे आहे तसेच ते नियमितपणे मिळत नाही. इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळते, हाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा