28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरराजकारण'जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे'

‘जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे’

Related

महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि संजय राऊत तुम्ही त्यावर उड्या मारता. हे रोजचे मनोरंजन बंद करा, असा घणाघात भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात केलेल्या वक्तव्यावरून पडळकर यांनी ही टीका केली आहे.

ट्विटच्या माध्यमातून पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पडळकर यांनी राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. पडळकर म्हणतात की, ओवेसींना आलिंगन देऊन मालेगाव, अमरावतीत सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्हीच पेश केलात. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीत. आता जनाब राऊत एमआयएम की मोहब्बत कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. हे रोजचे मनोरंजन आता बंद करा.

संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात असदुद्दीन ओवेसी यांच्यावर टीका करताना मुसलमान देशाचे नागरीक आहेत, त्यांनी देशाचे संविधान पाळून आपला मार्ग तयार करावा असे सांगण्याची हिंमत ओवेसी यांनी दाखवावी. नाहीतर ते भाजपाचे अंगवस्त्र म्हणून ओळखले जातील.

हे ही वाचा:

काय आहे आयुष्यमान भारत कार्ड?

धक्कादायक! … म्हणून तो देणार होता बायकोचा बळी!

किरीट सोमैय्यांचा कोल्हापूर दौरा आज सुरु, काय होणार कागलमध्ये?

भारत-तैवानमधील ‘हा’ करार वाढवतोय चीनची चिंता

योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील. ते सक्षम आहेत. पण महाराष्ट्रातील हिंदूना शिव्या देणारा शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत नाही. अशा भेकड प्रवृत्तींनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा