27.9 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरराजकारणपंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

Google News Follow

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप खासदार प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. त्यांनी आपली आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली होती. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्या घरीच विलगीकरणात थांबल्या होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली होती.

हे ही वाचा:

दीपाली चव्हाण आत्महत्त्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डीला अटक

लसीकरणाचा वेग मंदावला तर तिसऱ्या लाटेची भिती

पुजाऱ्याला थोबाडीत मारणारा मुजोर जिल्हाधिकारी निलंबित

रश्मी शुक्लांना सीबीआय साक्षीदार बनवणार

“मागील आठवड्यात १४ ते १८ एप्रिल या काळात संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मी प्रत्येक कोविड सेंटरला भेट दिली. तेथे रुग्णांची आणि डॉक्टरांची विचारपूस केली. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. त्यांना योग्य ती कारवाई करायला भाग पाडलं. या माध्यमातून मी आपलं कर्तव्यच पार पाडतेय. हे काम करुन मी पुन्हा १८ एप्रिलला मुंबईला आले. त्यानंतर २-३ दिवसांनी मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागली. मी २१ एप्रिल रोजी आरटीपीसीआर चाचणी केली. त्यात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय.” अशी माहिती प्रितम मुंडे यांनी व्हिडीओद्वारे दिली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा