34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरधर्म संस्कृतीमशिदीवरील भोग्यांसंबंधी मनसेला इशारा देणाऱ्या PFI नेत्यावर गुन्हा

मशिदीवरील भोग्यांसंबंधी मनसेला इशारा देणाऱ्या PFI नेत्यावर गुन्हा

Google News Follow

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्यासंबंधी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिले होते. त्यांनतर आता त्याविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘छेड़ोगे तो छोडेंगे नही’ असं म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा पीएफआयने मनसेला दिला आहे. हा इशारा देणाऱ्या पीएफआयच्या नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेने अल्टिमेटम दिल्यानंतर ठाण्यातील मुब्रा या ठिकाणी अनेक लोक जमले आणि आंदोलने केली. आंदोलनात लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरुन आंदोलनकर्त्यांनी मनसेला इशारा देत भोंग्यांना हात लावल्यास त्यांना सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.

मशिदींवरील भोंग्यावरुन आता महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. १७ फेब्रुवारी २००७ मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली. सध्या ही संस्था देशातल्या २३ राज्यांमध्ये सक्रिय आहे. राजकीय हत्या तसेच लव्ह जिहाद प्रकरणात या संघटनेचे नाव असते. काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात झालेल्या हिजाब वाद तापवण्यात या संघटनेचा हात असल्याचे म्हटले जाते.

नुकत्याच झालेल्या रामनवमी मिरवणुकांवर विविध भागात हल्ल्याच्या घटना घडल्या. या हल्ल्यामागेही पीएफआय संघटनेचा हात असल्याचा केंद्र सरकारला संशय आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसात या संघटनेवर बंदी घातली जाऊ शकते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा:

INFOSYS ची छप्परफाड कमाई

रशियासमोर आता आणखी दोन ‘युक्रेन’!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन येणार भारत दौऱ्यावर!

हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे करणार महाआरती

दरम्यान, आंदोलनानंतर पीएफआयचे नेते अब्दुल मतीन शेखानी आणि इतर २५ ते ३० जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १८८ भादवि सह म. पो. कायदा कलम ३७(३), १३५ या कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा