वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी होळीच्या आधी एक विचित्र वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना उद्या होळी आहे तर मोदींचा बळी द्या, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केले. त्यावरून सोशल मीडियात त्यांच्यावर टीका होत आहे.
एका भाषणात बोलताना प्रकाश आंबेडकरांनी लोकांना उद्युक्त केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी तुमची १५ वर्षे झाली. तुमचे सगळे गुलाम आहेत याची जाणीव आहे. एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रील काढल्याशिवाय राहणार नाही. त्या रील येऊ द्यायच्या नसतील. तर तुमची खुर्ची खाली करा.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, आमच्या पुढे दोनच पर्याय आहेत. देशाला वाचवा आणि ते करण्यासाठी तुम्हाला संपवा. आणि तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही खुर्ची खाली करा. आम्ही बाकी बघून घेऊ. बीजेपीवाल्यांना सांगतोय आण्ही तुमचा राजीनामा मागत नाही. सत्ता ही तुमचीच राहणार आहे. लोकांनी तुम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिलंय तुम्ही काय निवडणूक घेणार नाही. मात्र सत्तेत राहताना भारताचे सार्वभौम कायम राहिले पाहिजे, त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींचा बळी द्यावाच लागेल. उद्या होळी आहे, बळी कुणाचा द्यायचा. बळी कुणाचा द्यायचा. त्यावर लोक म्हणाले मोदींचा.
हे ही वाचा:
एमए, एमबीए, बीएड… मुली, सुनांच्या पदव्या बनल्या घरांची ओळख!
थंडाई म्हणजे केवळ चविष्ट पेय नाही तर… ‘हे’ आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का?
फेब्रुवारीत कार विक्रीचा ‘सुपरहिट’ महिना
यूएस-इस्रायल हल्ल्यांनंतर इराणमध्ये ५५५ जणांचा मृत्यू
प्रकाश आंबेडकर हे नेहमीच अशी वक्तव्ये करताना आढळतात. त्यांच्या समर्थकांना खुश करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी या भाषणात अशा पद्धतीची टोकाची वक्तव्ये केली अशी टीका त्यांच्यावर सोशल मीडियात होऊ लागली आहे. प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या हँडलवर हा व्हीडिओ शेअर करत एकप्रकारे लोकांना चिथावणीही दिली आहे, असेही लोक म्हणत आहेत.







