आम आदमी पार्टीने (आप) राज्यसभेतील आपल्या नेतृत्वात एक बदल केला आहे. पक्षाने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवून पंजाबचे राज्यसभा खासदार डॉ. अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. आम आदमी पार्टीने या फेरबदलाची माहिती देणारे एक अधिकृत पत्र राज्यसभा सचिवालयाला पाठवले आहे. त्यानुसार आतापासून डॉ. अशोक मित्तल हे राज्यसभेत पक्षाचे उपनेते असतील.
आम आदमी पार्टीने (आप) राज्यसभेतील आपल्या नेतृत्वात बदल केला असून, राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली आहे. पंजाबचे राज्यसभा खासदार आणि लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती असलेले अशोक मित्तल आता राज्यसभेत पक्षाचे उपनेते म्हणून काम पाहतील. संजय सिंह हे राज्यसभेतील पक्षाचे नेतेपद कायम ठेवतील. पक्षाने एका पत्राद्वारे राज्यसभा सचिवालयाला या बदलाची अधिकृत माहिती दिली आहे. त्याच पत्रात, ‘आप’ने अशीही विनंती केली आहे की, राघव चड्ढा यांना यापुढे राज्यसभेत पक्षाच्या कोट्यातून बोलण्याची संधी देऊ नये. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यसभेत आम आदमी पक्षाचे एकूण १० सदस्य आहेत, त्यापैकी सात पंजाबचे आणि तीन दिल्लीचे आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यानंतर हा पक्ष वरिष्ठ सभागृहातील चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा हे पक्षाच्या स्थापनेपासूनच त्याच्याशी संबंधित आहेत. त्यांनी २०१२ मध्ये दिल्ली लोकपाल आंदोलनादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.
हे ही वाचा:
गुढीपाडव्यात १८ दिवसांत १०००हून अधिक प्रकल्पांना मंजुरी
इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या मदतीबद्दल भूतान कृतज्ञ
हनुमान जन्मोत्सवानिमित्त ‘रामायण’चा टीझर रिलीज
“प. बंगालच्या मालदामधील घटना म्हणजे न्यायालयाच्या अधिकाराला दिलेले आव्हान”
पक्षाच्या या निर्णयामुळे आता पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चड्ढा यांनी व्यापक जनहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले, ज्यात मुलाच्या जन्मानंतर पितृत्व रजेची मागणी, विमानतळांवरील महागड्या जेवणाचा प्रश्न, गिग कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि मोठ्या शहरांमधील वाढत्या वाहतूक समस्येचा समावेश होता. आसाम निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही त्यांना वगळण्यात आल्याने, मतभेदांच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. तथापि, या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.







