23 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरदेश दुनियाममदानीचा उमर खालिदला पाठिंबा हे भारतविरोधी कारस्थान

ममदानीचा उमर खालिदला पाठिंबा हे भारतविरोधी कारस्थान

भाजपाने केली टीका

Google News Follow

Related

न्यूयॉर्कचे नव्याने शपथ घेतलेले महापौर झोहरान ममदानी यांनी उमर खालिद याला पाठिंबा दर्शवल्यानंतर, तसेच अमेरिकेतील आठ खासदारांनी तुरुंगात असलेल्या खालिदच्या न्याय्य व वेळेत खटल्यासाठी भारताच्या राजदूतांना पत्र लिहिल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने (भाजप) शुक्रवारी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भारतविरोधी कटाचा आरोप केला. भाजपने दावा केला की हा कथित कट अमेरिकेच्या भूमीवर रचला गेला असून, त्यामध्ये राहुल गांधी यांचा सहभाग आहे.

भाजपने शुक्रवारी २०२४ मध्ये राहुल गांधी आणि अमेरिकन खासदार जॅनिस शॅकोव्स्की यांच्यात झालेल्या भेटीचा दाखला देत, काँग्रेस नेत्याचे “भारतविरोधी” आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा आणखी एक पुरावा असल्याचे म्हटले. शॅकोव्स्की या त्या सात खासदारांपैकी एक आहेत, ज्यांनी २०२० च्या दिल्ली दंगलीप्रकरणी अटक झालेल्या उमर खालिद यांना जामीन देण्याची मागणी भारत सरकारकडे केली होती.

राहुल गांधी, जॅनिस शॅकोव्स्की आणि भारतविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप असलेल्या इल्हान ओमर यांचा एकत्रित फोटो पोस्ट करत भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’वर लिहिले की, अशा आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन होते. भंडारी यांनी ट्विटमध्ये म्हटले, “परदेशात जेव्हा जेव्हा भारतविरोधी कुभांड रचले जाते, तेव्हा पार्श्वभूमीत एकच नाव वारंवार दिसते ते म्हणजे राहुल गांधी. जे लोक भारताला कमकुवत करू पाहतात, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकाराची बदनामी करतात आणि दहशतवादविरोधी कायदे कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात, ते सगळे शेवटी त्यांच्याभोवतीच एकत्र येतात.

हे ही वाचा:

ख्रिसमसच्या दिवशी पाद्रीने अल्पवयीन मुलीचा केला बलात्कार

चीनवर नजर, तेजपूर हवाई तळाचा होणार विस्तार

जगभरात १,१६४ कोटींची कमाई करणारा ‘धुरंधर’ लडाखमध्ये करमुक्त!

राहुल गांधींचा दावा खोटा; कर्नाटकचे सर्वेक्षण म्हणते ईव्हीएम योग्य!

भंडारी यांनी पुढे दावा केला की, राहुल गांधींची २०२४ मधील अमेरिकेतील शॅकोव्स्की आणि इल्हान ओमर यांच्याशी झालेली भेट परदेशातील कायदेविषयक हालचालींशी जोडलेली आहे. त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये शॅकोव्स्की यांनी पुन्हा सादर केलेल्या ‘कॉम्बॅटिंग इंटरनॅशनल इस्लामोफोबिया ॲक्ट’चा उल्लेख केला. भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, या विधेयकात “भारताचे नाव स्पष्टपणे घेण्यात आले असून, मुस्लिम समुदायांवर कथित दडपशाही होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.”

भाजप प्रवक्त्यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतील संपर्कांचा एक क्रम मांडत, त्यानंतर परदेशी खासदारांनी उचललेल्या पावलांशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला.

“राहुल गांधी–भारतविरोधी लॉबी कशी काम करते?” असा सवाल उपस्थित करत भंडारी यांनी एक कालक्रम मांडला:
“२०२४ मध्ये अमेरिकेत जॅनिस शॅकोव्स्की यांनी राहुल गांधी आणि भारतविरोधी खासदार इल्हान ओमर यांची भेट घेतली. जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी ‘कॉम्बॅटिंग इंटरनॅशनल इस्लामोफोबिया ॲक्ट’ पुन्हा सादर केला, ज्यामध्ये भारताचे नाव घेत मुस्लिम समुदायांवरील कथित कारवाईचा आरोप केला.”

ते पुढे म्हणाले, “आणि २०२६ मध्ये तीच जॅनिस शॅकोव्स्की भारत सरकारला पत्र लिहून, गंभीर दंगली व हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांत यूएपीएअंतर्गत आरोपी असलेल्या उमर खालिदबाबत ‘चिंता’ व्यक्त करतात. शॅकोव्स्की यांनी ३० डिसेंबर रोजी भारत सरकारला पाठवलेल्या पत्रात उमर खालिद यांना जामीन देण्याची मागणी केली असून, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत खटला चालवावा, अशी विनंती केली आहे. तसेच खालिद याच्यासह अजूनही तुरुंगात असलेल्या सहआरोपींना न्याय्य वागणूक देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डेमोक्रॅट खासदार जिम मॅकगव्हर्न, जे या पत्रावर सही करणाऱ्यांपैकी एक आहेत, त्यांनी ‘एक्स’वर लिहिले,
“या महिन्याच्या सुरुवातीला मी उमर खालिदच्या पालकांची भेट घेतली. त्यांचा मुलगा गेली पाच वर्षांहून अधिक काळ भारतात खटला न चालवता तुरुंगात आहे.” मॅकगव्हर्न आणि इतर खासदारांनी पत्रात नमूद केले की, “उमर खालिद याच्यावर दहशतवादाचे आरोप लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या पुराव्यांची ताकद संशयास्पद आहे.” तसेच स्वतंत्र मानवाधिकार संस्थांच्या तपासणीत “उमर खालिद याचा दहशतवादी कारवायांशी थेट संबंध आढळून आला नाही,” असेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

चीनवर नजर, तेजपूर हवाई तळाचा होणार विस्तार

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत युरो व पाउंड मजबूत

… म्हणून दिल्ली सरकार अरविंद केजरीवालांविरुद्ध एफआयआर दाखल करणार

राहुल गांधींचा दावा खोटा; कर्नाटकचे सर्वेक्षण म्हणते ईव्हीएम योग्य!

या खासदारांनी भारताने आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय हक्क कराराचा (ICCPR) स्वाक्षरीदार देश म्हणून, “व्यक्तींना योग्य कालावधीत खटला मिळण्याचा हक्क द्यावा किंवा त्यांची सुटका करावी,” असे आवाहन केले.

भाजपचा ठाम दावा आहे की, परदेशी खासदारांकडून होणारे हे हस्तक्षेप भारतविरोधी मोहिमेचा भाग आहेत, आणि अशा आंतरराष्ट्रीय कारवायांचा थेट संबंध राहुल गांधी यांच्या परदेशी भेटींशी आहे. या आरोपांवर किंवा आंतरराष्ट्रीय खासदारांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेस पक्षाने किंवा राहुल गांधी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी उमर खालिदला पत्र लिहिताना म्हटले, “प्रिय उमर, कटुतेबाबत तू मांडलेले विचार आणि ती मनात न साठवण्याचे महत्त्व मला वारंवार आठवते. तुझ्या पालकांची भेट घेणे माझ्यासाठी आनंददायी होते.”

उमर खालिदचा जामीन अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने गेल्या महिन्यात युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा