26 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरराजकारणअदानी-अंबानींना लक्ष्य करून देशाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न

अदानी-अंबानींना लक्ष्य करून देशाची घडी विस्कटण्याचा प्रयत्न

ज्येष्ठ पत्रकार अभिजित मजुमदार यांनी केला आरोप

Google News Follow

Related

सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकांवर परिणाम करण्यासाठी भारतविरोधी गट देशातील मोठ्या उद्योगपतींवर एकापाठोपाठ एक आरोप करत आहेत. अंबानीपासून अदानी आणि वेदांता या उद्योजकांना परदेशात बसलेले गट लक्ष्य करत आहेत.  

या विदेशी संघटना भारतात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी हातमिळवणी करून या उद्योगपतींना लक्ष्य करत आहेत. ‘हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ थोपवण्यासाठी केले जात आहे. यासाठी जॉर्ज सोरोस आणि त्यांच्यासारख्या पाश्चिमात्य उद्योगांकडून निधी पुरवला जात आहे. खोट्या बातम्या आणि आरोपांच्या माध्यमातून जनतेला सरकारविरोधात भडकवून देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (ओसीसीआरपी) ही यातील प्रमुख संघटना असून त्यांना सोरोसकडून आर्थिक मदत पुरवली जाते,’ अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार अभिजित मजूमदार यांनी दिली.

हे ही वाचा:

धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत

तोतया लष्करी अधिकारी पुण्यातून अटक !

झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू हिथ स्ट्रीकचे निधन

लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार  

तज्ज्ञांच्या मते, आपला कट तडीस नेण्यासाठी ही माणसे देशातील बिगर सरकारी संघटनांना हाताशी धरून त्यांना आर्थिक मदत पुरवत असतात. या मदतीच्या बदल्यात या संस्था आणि माणसे खोट्या बातम्या आणि आरोपांचा प्रसार करून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. खोट्या धारणांचा प्रसार करून देशातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र खरी बाब उघड झाल्यावर या संघटना गायब होतात.    

जी२० शिखर परिषदेच्या दरम्यान मोठ्या संख्येने विदेशी पाहुणे भारतात येणार आहेत. या निमित्ताने या विदेशी शक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. भारताला मिळणाऱ्या जागतिक पाठिंब्यामुळेही त्यांची झोप उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते, सोरोस यांच्यासारख्या भारतविरोधी शक्तींना भारतात केंद्रात सौम्य सरकार हवे आहे. जेणेकरून त्यांना त्यांचा अजेंडा रेटता येईल. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादले जाणार नाहीत आणि त्यांच्या कामावर नजर ठेवली जाणार नाही, असे सरकार त्यांना हवे आहे. देशात सौम्य सरकार आल्यास हे देशविरोधी गट द्वेषाचा प्रसार करून देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न करतील. धर्मांतरणाला प्रोत्साहन दिले जाईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा