26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरराजकारणसावरकरांवर बोलायची लायकी आहे का राहुल गांधींची! गुळगुळीत मेंदूचा

सावरकरांवर बोलायची लायकी आहे का राहुल गांधींची! गुळगुळीत मेंदूचा

राज ठाकरे यांनी घेतला समाचार

Google News Follow

Related

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील पदयात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली होती. त्यावर जोरदार प्रहार करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या लायकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोरेगाव, मुंबई येथे झालेल्या मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले की, आम्ही जातीपातीतून प्रत्येक गोष्ट बघतो आहोत मूळ विषय विसरलो आहोत. फक्त महापुरुषांची बदनामी सुरू आहे. ते राहुल गांधी म्हणजे म्हैसूर सँडल सोप. गुळगुळीत मेंदूचा. लायकी आहे का सावरकरांवर बोलायची गधड्या. माहिती तरी आहेत का ते कुठे होते, काय करत होते, काय हालअपेष्टा सहन केल्या. माफी मागितली म्हणे. दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी असते. त्याचा विचार नाही करणार. म्हणणार दयेचा अर्ज केला. सर सलामत तो पगडी पचास हे ठाऊक नाही? ५० वर्षांची शिक्षा झालेला माणूस सडत बसण्यापेक्षा बाहेर येऊन हंगामा करतो याला स्ट्रॅटेजी म्हणतात. कृष्णनीती सांगते. चांगली गोष्ट घडणार असेल तर खोटे बोला पण ती गोष्ट व्हायला हवी.

हे ही वाचा:

अभिनेते पुनीत इस्सार ह्यांना १३ लाखांनी लुटले

उद्धव ठाकरे नैराश्यातून हे बोलत आहेत…

सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा स्लॅब अचानक कोसळला

 

राज ठाकरे पुढे म्हणाले की, शिवरायांनी गडकिल्ले दिले मिर्झाराजेंना. ती काय चितळेंची बर्फी होती का. त्यावेळी परिस्थिती अशी होती. आर्थिक अडचणी होत्या. आलेल्या सैन्याला तोंड देणे शक्य नव्हते. गडकिल्ले लिहून द्यायचेत ना देऊ. पण परिस्थिती निवळली की पुन्हा ते घेऊ. याला स्ट्रॅटेजी समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा. सगळ्या पक्षांना सांगणे आहे की बस करा. पंडित नेहरू, सावरकर, टिळक असे होते, तसे होते. दोन्ही बाजूंनी बदनामी करून काय हाती लागणार आहे.  या देशासमोर जे प्रश्न उभे आहेत. उद्योगधंद्यांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत. देशातल्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत.

पक्ष चालवतो तेव्हा प्रत्येक माणूस गुणदोषासह स्वीकारावा लागतो. त्याच्यातून महाराष्ट्राचं भलं करा. दोषांवर बोट ठेवलं तर हाती काही लागणार नाही. निघून जाईल सगळं. लोकांचा विश्वास उडत चालला आहे. तो थांबवायला हवा. हीच विनंती आहे गटाध्यक्षांना निवडणुका येती मी शब्द देतो. तुम्ही पूर्ण ताकदीने उतरा राज ठाकरे मुंबई माहनगरपालिका हातात आणून देतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा