29 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरराजकारणमुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर #रसमलाई होतेय ट्रेंडिंग; विषय काय?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर #रसमलाई होतेय ट्रेंडिंग; विषय काय?

मीम्स देखील व्हायरल

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील महानगर पालिकेचे निवडणूक निकाल समोर येताच बहुतांश ठिकाणी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे. प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देखील भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीने विजयी ध्वज फडकावला आहे. यानंतर सोशल मीडियावर विजयाच्या चर्चेसह ठाकरे गट आणि मनसे यांच्या अपयशाची चर्चा सुरू आहे. मीम्स देखील व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर, सर्वात जास्त ट्रेंडिंग विषय म्हणजे रसमलई. सध्या सोशल मीडियावर रसमलई जबरदस्त ट्रेंड करत आहे. यामागे कारण आहे ते म्हणजे तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष अन्नामलाई निवडणूक प्रचारासाठी मुंबईत आले तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रसमलईबद्दल व्यंग्यात्मक टीका करत त्यांच्यावर भाष्य केले होते. आता निवडणुकीचे निकाल आल्यानंतर, सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्या विधानाची आठवण करून देत लोकांनी मीम्स बनवायला सुरुवात केली आहे. तसेच हे मीम्स चांगलेच व्हायरल झाले आहेत.

हे ही वाचा:

बांगलादेशमध्ये हिंदू शिक्षकाचे घर जाळले

पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का

टी२० विश्वचषकापूर्वी नेपाळचा मोठा डाव

ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग, भाजप महायुती बहुमताकडे

निवडणुकीचे निकाल येताच, परिस्थिती उलटली असून राज ठाकरेंच्या मनसेने निराशाजनक कामगिरी केली, तर अन्नामलाई यांनी ज्या भागात सभा घेतल्या होत्या त्या भागात भाजपने विजय मिळवला. अन्नामलाई यांच्या नावाची खिल्ली उडवत राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत सांगितले की, भाजप आता बाहेरून “रसमलाई” आणत आहे. यावरून आता सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर आता एक्स वर #रसमलाई आणि #अन्नामलाई हे ट्रेंडिंग टॉपिक बनले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा