34 C
Mumbai
Tuesday, April 14, 2026
घरराजकारणपंतप्रधान आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवा!

पंतप्रधान आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवा!

पाटणा उच्च न्यायालयाने काँग्रेसला फटकारले

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री यांचा एआय-जनरेटेड व्हिडीओ बिहार कॉंग्रेसने पोस्ट केला होता. यावरून वाद निर्माण होऊन भाजपाने कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. अखेर हा एआय जनरेटेड व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवण्याचे निर्देश आता थेट न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई यांचा कॉंग्रेस पक्षाच्या बिहार युनिटने सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसारित केला होता. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. दरम्यान हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे निर्देश पाटणा उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाला दिले आहेत. हा आदेश कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पीबी बजंतारी यांनी दिला.

पक्षाच्या बिहार युनिटने सोशल मीडियावर एआय-जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काँग्रेस पक्षावर टीका झाली होती. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या दिवंगत आई हीराबेन यांचे स्वप्न पाहत असल्याचे दाखवण्यात आले होते. यावरून भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीका केल्याने या व्हिडिओमुळे राजकीय वाद निर्माण झाला. तसेच काँग्रेस नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. भाजपा दिल्ली निवडणूक सेलचे संयोजक संकेत गुप्ता यांनी ही तक्रार दाखल केली आहे. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या अनेक कलमांचा उल्लेख करण्यात आला आहे.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

कॅनडा: खलिस्तानी संघटनेची धमकी; भारतीय वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याचा इशारा

मात्र, काँग्रेसने असे म्हटले आहे की, पंतप्रधान किंवा त्यांच्या आईचा कोणताही अनादर झालेला नाही. तसेच गेल्या आठवड्यात, बिहार काँग्रेसनेही व्हिडिओची अंतर्गत चौकशी सुरू केल्याचे नमूद केले होते. पुढील कारवाई करण्यापूर्वी व्हिडीओ शेअर करण्यास कोण जबाबदार होते हे ठरवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा