28 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारणईडीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार केल्याचा संजय राऊत यांचा दावा

ईडीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार केल्याचा संजय राऊत यांचा दावा

Google News Follow

Related

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपावर आरोप केलेच पण ईडीवरही शरसंधान साधले. मात्र यासाठी त्यांनी ठोस पुरावे मात्र सादर केले नाहीत.

संजय राऊत म्हणाले की, ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत. ईडी आणि त्यांचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशीन झाले आहेत.

शिवसेना भवनात मंगळवारी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. १५ फेब्रुवारीला घेतलेल्या तथाकथित पत्रकार परिषदेप्रमाणे बाऊ न करता ही पत्रकार परिषद घेण्यात आली. सोबत खासदार अरविंद सावंतही होते.

या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. शिवसेना नेते अरविंद भोसले यांनी ही तक्रार केली आहे. पण ही तक्रार नेमकी कोणत्या पोलिस ठाण्यात केली आहे, हे भोसले यांनी स्पष्ट केले नाही.  ईडी हे सारे भाजपच्या काही नेत्यांच्या संगनमताने करत असून, त्यातून खोऱ्याने पैसा गोळा करण्यात येत आहे, असा आरोप यावेळी राऊत यांनी केला. तसेच येणाऱ्या काळात ईडीसोबतच्या त्या भाजप नेत्यांची नावे जाहीर करू, असेही राऊत म्हणाले.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलिसांत एक तक्रार आम्ही दाखल करतोय. या ‘एफआयआर’नुसार मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचाराबाबत, खंडणीबाबत तक्रार देतोय. चार ईडी अधिकाऱ्यांसह नवलानीबाबत आम्ही तक्रार करतोय. मुंबई पोलीस आजपासून याची चौकशी करत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस सक्षम आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो की, मुंबई पोलीस याप्रकरणाची आजपासून चौकशी सुरू करत आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा:

अनिल परबांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाचे छापे

महिलांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

RTO मधील ‘सचिन वाझे’ असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड

युक्रेनसाठी धावून आला अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो

संजय राऊत म्हणाले की, मी पंतप्रधानांना २८ फेब्रुवारी १३ पानेचे पत्र लिहिले. ज्या ईडीला आपण कामाला लावले आहे. ही ईडी काय करते आहे. ईडीचे काही अधिकारी व एजंट यांचे नेटवर्क बिल्डर्स, डेव्हलपर्स यांना घाबरविण्याचे कार्य करत आहोत. एक साखळीही आहे त्यांची. पंतप्रधानांना मी ती माहिती दिली आहे.

ईडीचे जे खंडणी रॅकेट आहे. जितेंद्र चंद्रलाल नवलानी सात कंपन्यांत १०० पेक्षा जास्त बिल्डरांकडून लूट केली आहे. त्यांच्या या कंपन्यांत पैसा ट्रान्सफर केला आहे. हा नवलानी हा ईडीचे वरिष्ठ अधिकारी संचालक, सहसंचालक यांच्यासाठी काम करत होता, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, माझे शब्द लिहून ठेवा. या प्रकरणात ईडीचे काही अधिकारी जेलमध्ये जाऊ शकतात. ही चोरी, लफंगेगिरी आहे. कोट्यवधी रुपये नेमके कुठे जातायत? हा पैसा पीएम केअर फंडमध्ये जातोय का, असा सवाल त्यांनी केला. हा सारा पैसा विदेशात जातोय. त्या मागे खूप मोठे रॅकेट आहे. यामध्ये भाजपचे नेतेही सहभागी आहेत. तुम्हाला याची माहिती देतोय. हे हवेत बोलत नाही. पुढच्या पत्रकार परिषदेत त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार आहे.

यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांचे आरोप फेटाळले. आपण सगळे आरोप योग्य कागदपत्रे देऊन केलेले आहेत पण संजय राऊत यांनी असे कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असे सोमय्या म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा