29.2 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरराजकारणसंजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही

संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही

Google News Follow

Related

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेले दोन-तीन दिवस रोज सकाळी पत्रकार परिषद घेत, ठाकरे सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत यांची भूमिका परमबीर सिंह, अनिल देशमुख प्रकरणावर रोज बदलताना दिसत आहे. त्यामुळे भाजपा नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्या बदलत्या भूमिकेवर टीका केली आहे.

“संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही. पहिला दिवस- मला काय आरोप झालेत माहित नाही. दुसरा दिवस-मंत्र्यांनी पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. पवार साहेबांच्या स्टेटमेंटनंतर परमबीर सिंह भाजपाचे डार्लिंग, केंद्र सरकार बरखास्त करा. संजय काहीतरी नीतिमत्ता असली पाहिजे माणसात.” अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

हे ही वाचा:

घरकोंबडा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागितली जाते

काँग्रेस अस्तित्वहीन पक्ष झाला आहे

सचिन वाझेच्या चौकशीतून पुढे येणार ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे नाव?

अमित शहांकडे आहेत आणखी काही लेटर बॉम्ब

‘या प्रकराकडे आम्ही गांभीर्याने पाहात नाही.’ असेही संजय राऊत यांनी सांगितले. त्याबरोबरच त्यांनी पुन्हा एकदा गुजरात आणि उत्तर प्रदेश मधील अधिकाऱ्यांनी लिहीलेल्या पत्रांचा उल्लेख केला आणि ‘प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना त्या त्या राज्यातले अधिकारी अशा तऱ्हेची पत्रं लिहीतात आणि त्या पत्रांचं काय होतं हे विरोधी पक्षनेत्यांना माहित असायला हवं.’ असे देखील ते म्हणाले. सीबीआय चौकशीला देखील घाबरत नाही असेही ते यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांचा समाचार घेणारे हे ट्विट निलेश राणे यांनी करून राणे राऊत संघर्ष अजून पेटवल्याचेच पाहायला मिळत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा