26 C
Mumbai
Friday, January 16, 2026
घरदेश दुनियासंजय राऊत यांचा इस्रायलकडून निषेध

संजय राऊत यांचा इस्रायलकडून निषेध

Google News Follow

Related

आपल्या वादग्रस्त विधानामुळे अनेकदा गोत्यात येणारे शिवसेनच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच ज्यूंबाबत वादग्रस्त विधान केले आहे. या विधानाची दखल इस्रायलने घेतली आहे. इस्रायली दूतावासाने भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कठोर शब्दांत पत्र लिहिले असून त्यात राऊत यांच्या संदेशाचा तीव्र निषेध केला आहे. तर, राऊत यांनी मात्र ‘इस्रायल-गाझा संघर्षाबाबत भारत सरकारची जी भूमिका आहे, तीच माझीही आहे,’ अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

१४ नोव्हेंबर रोजी गाझामधील अल शफा रुग्णालयातील दारूण परिस्थितीचे वृत्त शेअर करताना राऊत यांनी ‘हिटलर ज्यूधर्मियांचा इतका द्वेष का करत होता, हे आता समजले’, असे लिहिले आहे. या ट्वीटनंतर बराच वाद झाल्यानंतर राऊत यांनी हा संदेश हटवला असला तरी इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला होता. राऊत यांचा हा वादग्रस्त संदेश दोन लाख ९३ हजारांहून अधिक नागरिकांनी पाहिला होता.

इस्रायलच्या दूतावासाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून या ट्वीटमुळे धक्का बसल्याचे म्हटले आहे. भारतात कधीही न पाहिलेल्या ज्यूविरोधात एक भारतीय खासदार गुंतला असून हे धक्कादायक आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे भारताला नेहमी सहकार्य करणारे राष्ट्र दुखावले गेले आहे, असे इस्रायली दूतावासाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

बाळासाहेब ठाकरेंना ‘जनाब’ म्हटलं गेलं तेव्हा महाज्ञानी विश्वप्रवक्ते कुठे होते?

ताडोबातल्या वाघाने जोडीदाराच्या शोधात केला २ हजार किलोमीटरचा प्रवास

ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार प्रकरणी रोमीन छेडाला अटक

स्वतःला सोनिया हृदयसम्राट, राहुल हृदयसम्राट, शरद हृदयसम्राट अशा पदव्या लावा!

‘इस्रायल-गाझा संघर्षाबाबत भारत सरकारची जी भूमिका आहे, तीच एक लोकप्रतिनिधी म्हणून माझीही आहे. मात्र इस्रायलकडून गाझातील लहान मुलांची हत्या झाली तेव्हा मी इस्रायलवर टीका केली. ही टीका वगळता इस्रायलप्रकरणी माझी भूमिका वेगळी नाही,’ अशी सारवासारवर खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा