30 C
Mumbai
Tuesday, March 31, 2026
घरराजकारण"स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जात नसते"- चित्रा वाघ

“स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जात नसते”- चित्रा वाघ

Google News Follow

Related

“स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे.” असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. “संजय राठोड ज्या समाजाचे आहेत पूजा चव्हाणही त्याच समाजातील होती. आमच्या लेखी जातीला महत्व नाही. बंजारा समाजातील अनेक नेते मला फोन करुन याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे सांगत आहेत.” असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

संजय राठोडच्या पोहरादेवी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राठोड आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. “एरवी पोलीस संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या झाल्यास अगदी आजुबाजूच्या लोकांचीही पोलीस ठाण्यात चौकशी करतात. मात्र, पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या संजय राठोड यांची चौकशी न करताच महिला आयोग व मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. हे कसे होऊ शकते?” असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

“दिशा कायद्याचं काय झालं?”-चित्रा वाघ यांचा सवाल

संजय राठोड हा आज पोहोरादेवी मंदिरात दर्शनाला गेला आहे आणि आज तिथून त्याने माध्यमांशी संवादही साधला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा