ज्या बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात मंत्री म्हणून येण्याची संधी मिळाल्याचे आगळेवेगळे उदाहरण शिवसेनेचे विद्यमान मंत्री शंभूराज देसाई यांच्या रूपात पाहायला मिळाले आहे. शंभूराज देसाई हे गृह राज्यमंत्री आहेत आणि त्यांनी नुकताच मेघदूत बंगल्याच प्रवेश केला तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. शंभूराज देसाई अगदी ओक्साबोक्शी रडत होते.
याबाबतची कहाणी भावनाप्रधान आहे. मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. त्या काळातच शंभूराज देसाई यांचा जन्म याच बंगल्यात झाला. अर्थात, त्यांची आई या बंगल्यात सून म्हणून आली. शंभूराज देसाई पहिली पाच वर्षे या बंगल्यात राहिले.
महायुतीतील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्र्यांना जेव्हा बंगल्यांचे वाटप झाले तेव्हा राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाट्याला ‘मेघदूत बंगला’ आला. आज ३ऑगस्ट रोजी शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मेघदूत बंगल्यात गृहप्रवेश केला. गृहप्रवेशाच्या क्षणी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. ज्या बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात तब्बल ५५ वर्षांनंतर शंभूराज देसाई यांनी गृहप्रवेश केला.
गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात देसाई कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. नातेवाईक आणि काही निकटवर्तीय उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने विधी पार पडले, पूजा करून शंभूराज देसाई यांनी आशीर्वाद घेतले. ते केल्यावर त्यांचा बांध फुटला. ज्या बंगल्यात आपण खेळलो, वाढलो तिथेच मंत्री म्हणून आलो या भावनेतून त्यांच्या डोळ्यात अश्रु आले. ‘मेघदूत’ या बंगल्याशी संबंधित आठवणी, जुने क्षण आणि बालपणाचे अनुभव यामुळे घरातील प्रत्येकजण हा क्षण विशेष मानत होता.
हे ही वाचा:
‘तुमच्या बाटग्या विचारांना हिंदू धर्माने कधीही स्थान दिले नाही!’
उषा ठाकूर यांनी साध्वी प्रज्ञा यांचे केले अभिनंदन
२ रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे निधन
शंभूराज देसाई माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आज नवीन शासकिय निवासस्थान मेघदूत हा बंगला मुख्यमंत्र्यांनी दिला त्यांचे आभार मानतो. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने गृहप्रवेश केला. लहानपणापासून या बंगल्याशी अनेक आठवणी आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती की, मेघदूत बंगला मिळावा. मी एकदाच सांगितलं, दुसर्यांदा सांगावं लागलं नाही. गृहप्रवेशावेळी आईला भरून आलं, लग्नानंतर याच घरात त्यांनी प्रवेश केला. आम्ही सर्वच भावूक झालो. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात मोठं केलं. तसंच कार्य माझा हातून घडावं, या माझ्या भावना आहेत. आई-वडील दोघांची इच्छा होती की, मी स्पर्धा परीक्षा द्यावी. आई म्हणायची तू कलेक्टर होवो. पुण्यात शिकायला असताना मला सांगितलं जायचं की देशपांडे सरांकडे जा. माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यानंतर सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मतदार संघातील दिग्गज नेत्यांनी आईंना विनंती करून मला राजकारणात पाठवण्यास सांगितलं, असे त्यांनी म्हटले.
