बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) त्यांना दिलेल्या मृत्यूदंडावर सोमवारी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी या निकालाला “पक्षपाती, राजकीय प्रेरित” आणि “लोकशाही अधिपत्य नसलेल्या, बनावट न्यायाधिकरणाचा निर्णय” असे संबोधले.
नवी दिल्लीतील त्यांच्या निर्वासित वास्तव्यातून त्यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका मांडली. हसीना ५ ऑगस्ट २०२४ पासून भारतात आहेत. ७८ वर्षीय हसीना यांना मागील वर्षीच्या विद्यार्थी आंदोलनातील कथित भूमिकेसाठी मानवतेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले. त्यांनी सर्व आरोपांना “पूर्णपणे नकार दिला” आणि हा खटला “आधीच निश्चित झालेला निकाल” असल्याचे सांगितले.
न्यायालयीन प्रक्रियेवर टीका
हसीना यांनी त्यांच्या अनुपस्थितीत चाललेल्या सुनावणीवर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “मला स्वतःचे संरक्षण करण्याची न्याय्य संधी मिळाली नाही. माझ्या पसंतीचे वकील ठेवण्याचीही परवानगी नव्हती. त्यांच्या म्हणण्यानुसार, ICT मध्ये काहीही आंतरराष्ट्रीय किंवा निष्पक्ष नाही तसेच या न्यायाधिकरणाने केवळ आवामी लीगच्या सदस्यांवर कारवाई केली, तर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या हिंसेकडे दुर्लक्ष केले.
ICT ने त्यांना आंदोलन भडकवणे, आंदोलकांना ठार मारण्याचे आदेश देणे आणि अत्याचार रोखण्यात अपयशी ठरणे यांसह अनेक आरोपांत दोषी ठरवले. माजी गृह मंत्री असदुज्जामान खान यांनाही मृत्युदंड, तर माजी पोलीस प्रमुखाला खटल्यात सरकारी साक्षीदार बनल्यानंतर पाच वर्षांची शिक्षा झाली.
निकाल फेटाळताना हसीना म्हणाल्या की “जगातील कोणताही आदरणीय तज्ज्ञ हा न्याय मान्य करणार नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेचा वापर करून “बांगलादेशच्या निवडून आलेल्या पंतप्रधानाला हटवणे व आवामी लीगला राजकारणातून पुसून टाकणे” हे उद्दिष्ट आहे.
मुहम्मद युनूस सरकारवर आरोप
तिने तात्पुरते पंतप्रधान मुहम्मद युनूस यांच्यावर टीका करताना त्यांनी असंवैधानिकरीत्या सत्ता हस्तगत केली आणि ते आता अतिरेकी गटांच्या मदतीने सरकार चालवत आहेत, असे गंभीर आरोप केले.
हसिना यांच्या म्हणण्यानुसार, युनूस यांच्या सत्तेखाली विद्यार्थी, वस्त्रनिर्माती कामगार, डॉक्टर आणि शिक्षकांच्या आंदोलनांवर “निर्दयी दडपशाही” करण्यात आली. शांततापूर्ण आंदोलकांना “गोळ्या घालण्यात आल्या”, पत्रकारांना “छळ व अत्याचार” सहन करावे लागले.हसीना यांनी असा आरोपही केला की युनूस यांच्या सैन्याने आवामी लीगच्या कार्यकर्त्यांची घरे, व्यवसाय आणि मालमत्ता मोठ्या प्रमाणात नष्ट केली.
हे ही वाचा:
न्यू टाउनमध्ये कारमधून ५ कोटी रुपये जप्त
जागतिक पातळीवर साजरा झाला गीता महोत्सव
बंगालमधील एसआयआरमुळे घुसखोर बांगलादेशात पळू लागलेत!
डिजिटल अरेस्ट दाखवून महिलेचे ३२ कोटी लुटले
मृत्यूंच्या आकड्यांवर व पुराव्यांवर हसीना यांचा दावा
जुलै–ऑगस्ट मधील गोंधळाला त्यांनी देशासाठी मोठी शोकांतिका म्हटले, पण स्वतःवर असलेले पूर्वनियोजित हत्यांचे आरोप नाकारले.
त्यांचे म्हणणे होते की, अभियोजन पक्षाकडे ठोस पुरावे नाहीत तसेच सरकारी कारवाई “कायद्याच्या चौकटीत राहून” करण्यात आली, १४०० हा मृतांचा आकडा फुगवलेला आहे. बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाने ६१४ कुटुंबांना राज्य मदत दिल्याची पुष्टी असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेक साक्षीदार “दडपणाखालील सरकारी कर्मचारी” होते, असा आरोपही त्यांनी केला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात सामोरे जाण्याची तयारी
हसीना म्हणाल्या, “मी एका निष्पक्ष आंतरराष्ट्रीय न्यायालयात माझ्या विरुद्धच्या आरोपांना सामोरे जाण्यास तयार आहे. तेथे पुराव्यांची योग्य तपासणी होईल.” त्यांनी दावा केला की, तात्पुरती सरकार अशी प्रक्रिया होऊ देत नाही कारण
“ICC मला निर्दोष ठरवेल, हे त्यांना माहीत आहे.”
राजकीय परिस्थिती
हा निकाल २०२५ च्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आला आहे. हसिना यांच्या आवामी लीगला आधीच बंदी आहे आणि यामुळे देशातील राजकीय तणाव आणखी वाढला असून तज्ज्ञांनी अस्थिरतेचा इशारा दिला आहे.







