29.2 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणमुंबईतील रुग्ण पुण्यात पाठवणे हेच मुंबई मॉडेल?

मुंबईतील रुग्ण पुण्यात पाठवणे हेच मुंबई मॉडेल?

Google News Follow

Related

ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी मंगळवारी ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी म्हटले.

हे ही वाचा:

अनिल देशमुख प्रकरण आता ‘ईडी’कडे

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

जी-२३ पुन्हा आक्रमक?

इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा भडकला

कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असे नितेश राणे यांनी सांगितले. आता नितेश राणे यांच्या आरोपाला शिवसेना आणि महाविकासआघाडीचे इतर नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा