29 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारण'रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत'

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

Related

शिवसेनच्या गजानन कीर्तिकरांनी दिला इशारा

शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे असलेले महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद समोर येत असतात. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर सध्या अहमदनगर जिल्हा शिवसंपर्क अभियानासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कर्जत येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे की, “राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटुंबाला मोठी परंपरा असून त्याची जाण राजकारण करताना ठेवण्याची गरज आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत,” असा इशारा खासदार गजानन किर्तिकर यांनी दिला आहे.

तसेच आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. मतदारसंघामधल्या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे,” असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे.

“शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे चित्र असून त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत,” असा इशाराच शिवसेनेचे खासदार गजानन किर्तिकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

हे ही वाचा:

…तर १९४७ची परिस्थिती पुन्हा निर्माण होईल!

यासिन प्रकरणावरून टीका करणाऱ्या इस्लामिक परिषदेला भारताने ठणकावले

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या २१ गोष्टींचे अभिवाचन

संभाजी महाराजांची ठरवून कोंडी

यापूर्वीही ग्रामविकास निधी वरून  “आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते,” असे म्हणत गजानन कीर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला हाणला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा