26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारणशिवसेनेत आमदारांच्या नाराजीनाट्याला सुरुवात?

शिवसेनेत आमदारांच्या नाराजीनाट्याला सुरुवात?

Google News Follow

Related

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मला त्रास देत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे जळगावमधील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. चिमणराव पाटील हे पारोळ्याचे आमदार आहेत. मी ज्येष्ठ आमदार असून स्थानिक पातळीवर माझे मत विचारात घेतले जात नाही. गुलाबराव पाटील यांच्याकडून मला डावलले जाते, ही वस्तुस्थिती आहे, असे चिमणराव पाटील यांनी म्हटले त्यामुळे आता जळगावात शिवसेनेचा मंत्री विरुद्ध आमदार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

चिमणराव पाटील यांनी शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. गुलाबराव पाटील यांना माझं या भागातील वर्चस्व सहन होत नाही. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव घडवण्यात आला. त्यानंतर अजूनही मला अनेकदा डावलण्याचा प्रयत्न होतो. मी शिवसेनेत राहू नये, असे अनेकांना वाटत असल्याचेही चिमणराव पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. भाजपमध्ये तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीतही बाहेरचे लोक आमदार आहेत, आमच्यासारखे काही थोडेच एकाच पक्षाचे एकनिष्ठ आहेत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते. भाजपा खासदार रक्षा खडसे आणि भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था बिकट

पुलवाममध्ये दहशतवाद्यांशी चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

भाजपवर आरोप केल्याशिवाय संजय राऊत यांना जेवणच पचत नाही

जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक

कोणीही ठामपणे सांगू शकत नाही हा माझा पक्ष आहे. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय वाद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एक होण्याची गरज आहे” असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. भालोद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण आणि प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाला माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा