27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरराजकारणकोणत्या महापालिका निवडणूका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढल्या जाणार?

कोणत्या महापालिका निवडणूका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने लढल्या जाणार?

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. यामध्ये आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा समावेश आहे. तर त्यासोबत राज्यातील इतरही महत्त्वाच्या शहरात महापालिका निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धती नेमकी कशा प्रकारची असणार यावर गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण त्यावर आता पडदा पडला आहे. कारण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धती असणार हे जाहीर करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक काढून या संबंधीची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ३१ डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही घोषणा करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे. ‘शासनाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ अन्वये सर्व महानगरपालिकाांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दती ऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल.’ असे या पत्राकात नमूद करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

वरुण सरदेसाईंना लागली संस्कारांची चिंता

सीडीएस, जनरल बिपिन रावत यांनी तालिबानला दिला ‘हा’ इशारा

मालकासकट बाईक उचलणाऱ्या पोलिसाची उचलबांगडी

 

हुजरेगिरीमुळे बावचळलेले संजय राऊत ‘भोक पडलेल्या फुग्याला’ एवढे का घाबरत आहेत?

२०१७ साली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धती नुसार या निवडणुका लढल्या गेल्या होत्या. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने या संबंधीचा निर्णय घेतला होता. पण आता ठाकरे सरकारने त्यात बदल केल्यामुळे निवडणुका या एक सदस्य प्रभाग पद्धती नुसार लढवल्या जाणार आहेत.

यामध्ये मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवांडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा