25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरराजकारण१२ राज्यात मतदारयादीचे SIR सुरू

१२ राज्यात मतदारयादीचे SIR सुरू

९५% पेक्षा जास्त मतदारांपर्यंत गणना प्रपत्र पोहोचले

Google News Follow

Related

देशातील १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेला वेग आला आहे. ४ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेत गणना प्रपत्रांचे वितरण जवळपास पूर्णत्वाला पोहोचले आहे. सर्व राज्यांतील विधानसभा क्षेत्रांमध्ये बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरांत जाऊन गणना प्रपत्र आणि घोषणा प्रपत्र देत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पूर्व-भरण केलेले मुद्रित गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक मतदार हे फॉर्म ऑनलाइनही भरू शकतात.

१२ राज्यांमध्ये गणना प्रपत्र वितरणाचे काम ९५.४४% पूर्ण झाले आहे. एकूण ५०,९७,४३,१७३ मतदारांपैकी ४८,६७,३७,०६४ मतदारांना प्रपत्र दिले गेले आहेत. राज्यनिहाय प्रगती : अंदमान-निकोबार प्रगती : ९९.६३% एकूण ३,१०,४०४ पैकी ३,०९,२६३ मतदारांना प्रपत्र मिळाले. छत्तीसगड प्रगती : ९३.८४% एकूण २,१२,३०,७३७ पैकी १,००,२१,९०५ मतदारांना वितरण. गोवा : १००% काम पूर्ण. एकूण ११,८५,०३४ मतदारांना सर्व प्रपत्र वितरित. गुजरात प्रगती : ९८.५८% ५,०८,४३,४३६ पैकी ५,०१,२३,७९६ मतदारांना प्रपत्र.

हेही वाचा..

बिहारच्या जनतेने जातीयवादाच्या विषाला नाकारले

ग्रेटर बांगला देश हे हसीना यांचेही खानदानी स्वप्न; एसआयआरला विरोध का होतोय?

इथिओपियाहून ‘कॅप्सूल’ कोकेन तस्करी

मुंबईत ‘शस्त्र विक्री’चा कट उधळला!

केरळ प्रगती : ८७.५४%. २,७८,५०,८५४ पैकी २,४३,८०,१३६ मतदारांपर्यंत प्रपत्र पोहोचले. लक्षद्वीप : १००% वितरण एकूण ५७,८१२ मतदारांना प्रपत्र. मध्य प्रदेश प्रगती : ९८.३८%, ५,७४०६,१४० पैकी ५६,४७८,४८८ मतदारांपर्यंत पोहोचले. पुडुचेरी प्रगती : ९३.८८%. १०,२१,५७८ पैकी ९५९,०५२ मतदारांपर्यंत वितरण. राजस्थान प्रगती : ९७.३२%, ५,४६,५६,२१५ पैकी ५,३४,११,९९१ मतदारांना प्रपत्र मिळाले. तामिळनाडू प्रगती : ९२.०४%, ६,४१,१४,५८२ पैकी ५,९०,१३,१८४ मतदारांना वितरण. उत्तर प्रदेश प्रगती : ९४.३७%, १५,४४,३०,०९२ पैकी १४,५७,३२,४५४ मतदारांपर्यंत प्रपत्र पोहोचले. पश्चिम बंगाल प्रगती : ९८.०८% ७,६६,३६,२८८ पैकी ७,५१,६३,९७० मतदारांना वितरण.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा