22 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरक्राईमनामासंभाजीनगरातील परिस्थिती चिघळेल अशी वक्तव्ये काही नेते देत आहेत!

संभाजीनगरातील परिस्थिती चिघळेल अशी वक्तव्ये काही नेते देत आहेत!

देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे इशारा; संभाजीनगरात रामनवमीच्या दिवशी राडा

Google News Follow

Related

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यापासून तेथील वातावरण सातत्याने अस्वस्थ ठेवण्याचे काम सुरू आहे. रामनवमीच्या दिवशीही तेथे किराडपुरा भागात राडा झाला. राम मंदिराच्या बाहेर दगडफेक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. ते प्रकरण एवढे चिघळले की पोलिसांच्या १३ गाड्या जाळण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिस जखमीही झाले आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सरकारने ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. काही लोक चुकीच्या प्रतिक्रिया देऊन ही परिस्थिती आणखी चिघळावी म्हणून प्रयत्न करत असले तरी आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले की, संभाजी नगर मधली घटना दुर्दैवी असून आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी तिथे ३५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पण काही लोक चुकीच्या प्रतिक्रिया देऊन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घ्यावे. कोणीही चुकीची वक्तव्ये करू नयेत. ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते दुर्दैव आहे. काही जण चुकीचे बोलत आहे. पण छत्रपती संभाजी नगर शहरांत आता परिस्थिती नियंत्रणात आहे. सगळ्यांनी शांतात पाळावी कारण शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे.

काय आहे प्रकरण ?

छत्रपती संभाजी नगर नामांतराच्या आता महिनाभरानंतर बुधवारी मध्यरात्री मोठा तणाव निर्माण झाला होता. रामनवमीच्या उद्देशाने राम मंदिर परिसरात रामनवमी उत्सवाची तयारी सुरु असताना अज्ञात तरुणांच्या गटाने अचानक दगड फेक सुरु केल्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यानंतर राडा होऊन यामध्ये पोलिसांची आणि खाजगी वाहने अशा एकूण १३ गाड्या जाळण्यात आल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती आहे. शिवाय बंदोबस्तासाठी असलेले पोलीससुद्धा जखमी झाले आहेत. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेमध्ये १२ गोळ्या झाडाव्या लागल्या आणि अश्रुधुराचा नळकांड्या पण फोडण्यात आल्या होत्या. सध्या मंदिर परिसरात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा: 

बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

कर्नाटकात एकाच टप्प्यामध्ये होणार निवडणुका

पुढची रामनवमी नव्या श्रीराम मंदिरात होईल?

दरम्यान, या सगळ्या आगीत तेल ओतण्याचे काम संजय राऊत यांनी केले. दंगली घडाव्यात हा राज्य सरकारचा एकमेव हेतू आहे असे ते म्हणाले. अंबादास दानवे यांनी दोन दिवसापूर्वीच शहरात दंगल होणार असल्याचे भाकीत केले होते तर त्यांनी पोलिसांना माहिती का दिली नाही असा सवाल पालकमंत्री सांदिपान भुमरे यांनी केला आहे. तर विरोधी पक्षनेते अजित पवार संभाजी नगर प्रकरणावरून म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणे हे पोलीस यंत्रणेचे काम असते. ही व्यवस्था ठेवताना कुठल्याही राजकीय दबावाखाली यंत्रणेने करता कामा नये.

काय वस्तुस्थिती घडली याचा मास्टर माईंड कोण आहे हे मुद्दामहून अशा प्रकारच्या दंगली घडवून आणल्या जात आहेत का हे शोधणे गरजेचे आहे असेही ते पुढे म्हणाले.  माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत म्हणत होते कि आता दंगे सुरु होणार आहेत. राऊत यांना हेच दंगे म्हणायचे होते का? मी पुन्हा एकदा सांगतो संजय राऊत, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या वतीने सांगत होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा