29 C
Mumbai
Thursday, May 6, 2021
घर राजकारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकार उताणे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकार उताणे

Related

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार ५ मे) सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्चला निकाल राखून ठेवला होता. वकील जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं.

मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टाने योग्य ठरवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली. १९९२ मधील इंदिरा साहनी खटल्याप्रकरणी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे की, नाही आणि इंदिरा साहनी खटल्याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे पाठवण्याची गरज आहे की नाही, याचं परीक्षण करणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी असलेले पडद्यामागचे सूत्रधार आज सरकारमध्ये आहेत. अशा परिस्थितीत केवळ राजकीय अनास्थेमुळे आज सरकारला तोंडावर पडावे लागले हे या सूत्रधारणचे अपयश म्हणावे लागेल.

हे ही वाचा:

मुंबईतील लसीकरणाला सुरूवात

देशात ऑक्सिजन पुरवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न

बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण

बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचं पाच न्यायमूर्तींचं बेंच आज निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नाझीर, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट्ट यांनी या प्रकरणासंदर्भात स्वतंत्र निकालांचं लेखन केलं आहे. मराठा आरक्षणासाठी मोठ्या बेंचकडे जाण्याची गरज नाही, असं  सुप्रीम कोर्टानं  म्हटलं आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,514चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
991सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा