25 C
Mumbai
Sunday, December 28, 2025
घरराजकारणसुप्रिया सुळे म्हणतात, मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमवर जिंकल्या

सुप्रिया सुळे म्हणतात, मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमवर जिंकल्या

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून ओमर अब्दुल्ला, तृणमूलनंतर सुप्रिया सुळेंनीही सोडला काँग्रेसचा हात

Google News Follow

Related

लोकसभा आणि विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपने आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्या आणि यातूनच एकतर्फी निकाल लागला अशी ओरड विरोधक करत आहेत. इंडी आघाडीमधून काँग्रेसने हा मुद्दा जास्त ताणून धरला असून ‘इंडी’ आघाडीमधील काही घटक पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड होत नसल्याचे उघडपणे सांगून यातून काढता पाय घेतला आहे. अशातच आता काँग्रेसचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा आहेर मिळाल्याचे बोलले जात आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंबंधीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी बुधवारी सांगितले की, “मी ठोस पुराव्याशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर कोणतेही आरोप करू शकत नाही. पण, इतर पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा दावा केल्यामुळे या विषयावर चर्चा आवश्यक आहे. माझ्याकडे ठोस पुरावे असल्याशिवाय आरोप करणे योग्य नाही, असे मला वाटते. मी यापूर्वी चार निवडणुका ईव्हीएमद्वारे जिंकल्या आहेत,” अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मांडली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरोधाच्या मुद्द्यावरून ‘इंडी’ आघाडीत ताळमेळ नसल्याचे बोलले जात आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही यापूर्वी ईव्हीएम संबंधीच्या काँग्रेसच्या आरोपांवरून काँग्रेसची कानउघडणी केली होती. ईव्हीएमबाबत काँग्रेसकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना ओमर यांनी हास्यास्पद ठरविले होते. तर, त्यांनी म्हतके होते की, जेव्हा तुम्हाला याच ईव्हीएमवर लोकसभेत शंभर जागा मिळतात, तेव्हा तुम्ही पक्षाचा कसा विजय झाला याचे गुणगान गाता. पण काही महिन्यांनी जेव्हा निकाल बदलतात तेव्हा निकाल काही आपल्या बाजूने लागले नाहीत असे म्हणत त्याच ईव्हीएमला विरोध करता. तुमचा ईव्हीएम मशिनवर विश्वास नाही तर तुम्ही निवडणुका का लढता?

हे ही वाचा : 

राहुल गांधी मस्साजोग न जाण्याची ही आहेत कारणे…

विनोद कांबळी म्हणाला, ही चूक पुन्हा होणार नाही!

अरविंद केजरीवाल यांना घरचा अहेर, महिला सन्मान योजनाच अस्तित्वात नसल्याचा गौप्यस्फोट

केजरीवाल यांची ‘महिला सन्मान योजना’ अस्तित्वातच नाही? दिल्ली सरकारनेचं केले स्पष्ट

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनीही विरोधकांकडून होत असलेले ईव्हीएमवरील आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते की, “जे ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्याकडे काही असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन डेमो दाखवावा. मॉक पोल आणि मतमोजणीच्या वेळी बूथवर काम करणारे लोक जर योग्य तपास करत असतील तर या आरोपात काही योग्यता आहे असे वाटत नाही. जर यापुढेही अजून कोणाला वाटत असेल की ईव्हीएम हॅक होऊ शकतात, तर त्यांनी निवडणूक आयोगाला भेटावे आणि ईव्हीएम कसे हॅक केले जाऊ शकतात ते सांगावे. नुसती निरर्थक विधाने करून काहीही होणार नाही.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा