25 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरराजकारण'महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?'

‘महिला सुरक्षेबद्दल बोलणारे उद्धव माझ्यासाठी काय करणार?’

पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

Google News Follow

Related

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येताच राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यावरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू असताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महिलांच्या सुरक्षेबाबत भूमिका मांडली. त्यानंतर राज्यातील एका महिलेने महिला सुरक्षेबाबत उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मीडिया ‘एक्स’वर पोस्ट करताच ते चांगलेच व्हायरल झाले आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित उद्धव ठाकरेंकडून योग्य न्यायाची अपेक्षा केली आहे. शिवाय त्यांनी पत्र लिहित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला सुरक्षेवर बोलत असताना संजय राऊतांनी जे माझ्यासोबत केलं त्यावर बोला, असं आवाहन स्वप्ना पाटकर यांनी त्यांच्या पत्रात केलं आहे.

स्वप्ना पाटकर यांनी पत्रात काय म्हटलं आहे?

नमस्कार उद्धवदादा,

महिला सुरक्षिततेबद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. “नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत.” असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटले.

मी २०१६ ते २०२१ तुम्हाला अनेक ईमेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते आणि त्यांच्या शिवाय इतर कोणासोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते. माझावर हल्ले झाले, मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे, माझे काम बंद करण्यात आले, घराबाहेर काढणार हा दबाव टाकला गेला. सगळे माहित असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले.

माझा एक चित्रपट ‘डॉक्टर रखमाबाई’ रिलीज होऊ दिला नाही. माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले असे मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल. त्यांनीच केले हे मला माहित आहे. फोन वर शिवीगाळ, घर उध्वस्त केले, काम बंद करून जगण्याचे साधन संपवले. हे सगळे माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली. आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली असो. आता तुम्ही बहीणीसाठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. तुमची लाडकी बहीण, स्वप्ना पाटकर.

हे ही वाचा..

लडाखच्या समृद्धीसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय; पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती

भाजपाकडून जम्मू- काश्मीरसाठी १५ उमेदवारांची यादी जाहीर

कोलकाता प्रकरण : पॉलीग्राफ चाचणीत अनेक धक्कादायक खुलासे

जम्मू काश्मीर: माजी एसएसपी मोहनलाल भगत यांचा भाजपमध्ये प्रवेश !

खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर या साक्षीदार आहेत. २०२२ ला एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात संजय राऊतांनी स्वप्ना पाटकर यांना शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला होता. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर देखील नोंदवला होता. स्वप्ना पाटकर या सिनेमा दिग्दर्शिका आणि मनसोपचार तज्ज्ञ आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या पत्राचे ट्विट भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रिट्विट केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरेजी, तुमच्या उत्तराची महाराष्ट्र वाट पाहतोय.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा