30 C
Mumbai
Sunday, August 23, 2026
घरराजकारणतमिळनाडू सरकार नवजात बाळांना देणार अनोखी भेट

तमिळनाडू सरकार नवजात बाळांना देणार अनोखी भेट

१ लाख २८ हजार आंगठ्यांची दिली ऑर्डर

Google News Follow

Related

तमिळनाडूमध्ये नवजात बाळांच्या स्वागतासाठी सरकारने अनोखी योजना जाहीर केली आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक पात्र नवजात बाळाच्या बोटात सरकारकडून एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घातली जाणार आहे. ‘मामाची सोन्याची अंगठी’ या योजनेची अंमलबजावणी १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, त्यासाठी तब्बल १ लाख २८ हजार ४९९ सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे २२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री थलपती विजय यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना सोन्याची अंगठी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने सरकारने हे पाऊल उचलले आहे. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ २२ जून २०२६पासून सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना दिला जाणार आहे. सी. एन. अण्णादुराई यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबरपासून अंगठ्यांचे वाटप सुरू होणार आहे.
हे ही वाचा:
रस्ता नाही, पूल नाही… उपचाराअभावी २३ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

राहुल गांधींकडून द्वेष, पण काँग्रेस मुख्यमंत्री शिवकुमार यांना अदानी हवेहवेसे

महामेट्रोने म्हटले काँग्रेसचे आरोप महाखोटे !

साखर महागण्यामागे नेमकं काय? इथेनॉल की उत्पादनातील घट?

पहिल्या टप्प्यातील सर्व अंगठ्या २२ कॅरेट सोन्याच्या असून, प्रत्येक अंगठीचे वजन एक ग्रॅम असेल. एकूण १ लाख २८ हजार ४९९ अंगठ्यांसाठी सुमारे १२८.५ किलो सोन्याची गरज भासणार आहे. सध्याच्या बाजारभावानुसार एका अंगठीसाठी सरकारला अंदाजे १४ हजार ८५० रुपये खर्च येणार आहे. दोन दागिने विक्रेता कंपन्यांना या अंगठ्या तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.

या योजनेमागचा मुख्य उद्देश सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे हा असल्याचे सांगण्यात आले आहे. नवजात बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासोबतच सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे एका बाजूला नवजात बाळाला आयुष्याच्या सुरुवातीलाच सोन्याची खास भेट मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा