25 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय

ठाकरे सरकार दोन तोंडांनी बोलतय

Google News Follow

Related

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्दयावरून ठाकरे सरकारमध्येच विसंवाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ठाकरे सरकारचा सामाजिक न्याय केवळ बोलण्यापुरताच आहे. पदोन्नतीतील आरक्षणाबातब आघाडी सरकारची भूमिका दुटप्पी आहे. याबाबत एकानं वेगळं बोलायचं आणि दुसऱ्याने आणखी वेगळं बोलायचं हे त्यांचं ठरलं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस आज भंडारा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी भंडारा जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी आग लागलेल्या भंडारा सिव्हिल रुग्णालयालाही भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना पदोन्नतीतील आरक्षणाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा त्यांनी आघाडीवर टीका केली. यांचा सामाजिक न्याय बोलण्यापुरता आहे. त्यांचा बोलण्याचा सामाजिक न्याय वेगळा आहे आणि कृतीतील सामाजिक न्याय वेगळा आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

यावेळी त्यांनी भंडाऱ्यातील कोरोना परिस्थितीवर समाधाना व्यक्त केलं. दुसऱ्या लाटेत भंडाऱ्यातील स्थिती अत्यंत खराब होती. आता भंडाऱ्यातील रुग्ण संख्या कमी झाली असून परिस्थिती निवळत आहे, असं ते म्हणाले. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी सुरू आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे. खासदार या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

भंडाऱ्यात म्युकर मायकोसिसचे काही रुग्ण सापडले आहेत. पण या रुग्णांचे ऑपरेशन करण्याची सुविधा भंडाऱ्यात नाही. नागपूरला रुग्ण न्यावे लागतात. मात्र, म्युकर मायकोसिसच्या रुग्णाचे लवकर निदान होऊन त्याच्यावर तात्काळ उपचार केले तर परिस्थिती नियंत्रणात येईल, तशा सूचनाच मी प्रशासनाला दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

अनेक महिने महाराष्ट्रात लॉकडाऊन ठेवणार का?

शिवसेना नेत्याने लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले

मुख्यमंत्र्यांचा नौटंकी दौरा

उजनीचा पाणी प्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन

या सिव्हिल रुग्णालयात दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही रुग्णालयात फायर सेफ्टी यंत्रणा बसविण्यात आली नाही. आता टेंडर निघाल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याबाबतची अधिक माहिती नाही. एवढी मोठी दुर्घटना होऊनही फायर सेफ्टी यंत्रणा न बसविणे हा अक्षम्य निष्काळजीपणा आहे, असं ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा