30 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणठाणे महापालिका आयुक्त शिवबंधनात?

ठाणे महापालिका आयुक्त शिवबंधनात?

Google News Follow

Related

ठाणे महापालिकेची मुदत संपल्यामुळे सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. पण असे असतानाही, आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शिवसेनेचे माजी महापौर आणि माजी नगरसेवकांसह स्मार्ट सिटीतील विकासकामांचा दौरा केला आहे. सध्या या दौऱ्यावरून ठाण्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.शिवसैनिकांसोबत दौरा करणारे आयुक्त हे शिवबंधनात अडकले आहेत का? असा बोचरा सवाल भाजपाचे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांनी विचारला आहे. स्मार्ट सिटीतून पूर्ण झालेल्या कामांचे श्रेय शिवसेनेला देण्याचा आयुक्त प्रयत्न करीत आहेत का? असा सवालही पतकी यांनी केला आहे.

ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत सुशोभिकरणाच्या कामाबरोबरच अन्य कामांची पाहणी करण्यासाठी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी काल दौरा केला होता. या दौऱ्यात अष्टविनायक चौक ते गणेश विसर्जन घाट, ऍम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, विद्युत रोषणाई, जेट्टी रस्त्याचे नुतनीकरण, ऐतिहासिक तोफांचे जतन करण्याकरिता चौथऱ्याचे बांधकाम, दशक्रिया विधीकरिता चौथरा आदी कामांची आयुक्तांनी पाहणी केली होती. या दौऱ्यात शिवसेनेचे माजी महापौर, शिवसेनेचे काही माजी नगरसेवक सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

प्रवीण दरेकरांना न्यायालयाकडून दिलासा; अटकेपासून संरक्षण

…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य

देवभूमीत आजपासून पुष्करराज

महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू असताना, आयुक्तांकडून निपक्षपातीपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट असताना, तत्कालीन आयुक्तांनी कोणत्याही पक्षाला प्राधान्य न देण्याचा नियम काटेकोरपणे पाळला होता. मात्र, काल विद्यमान आयुक्तांनी पाहणी दौऱ्यात शिवसैनिकांना निमंत्रित करून प्रशासकीय धक्का दिला. या दौऱ्याची केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती कळविण्यात आली होती का? आयुक्तांच्या दौऱ्यावेळी पदाधिकारी कसे पोहचले. आयुक्तांनी शिवबंधन बांधले आहे का? असा सवाल सुजय पतकी यांनी केला आहे. भाजपाचे कोपरीतील माजी नगरसेवक भरत चव्हाण यांना दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर ते घाईघाईत दौऱ्याच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांना आयुक्तांचा हा पाहणी दौरा असल्याचे निदर्शनास आल्यावर ते निघून गेले, असेही पतकी यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांबात केंद्र सरकारकडून चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून आता पूर्ण होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपड केली जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पदाधिकारी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेणार का, असा सवाल पतकी यांनी केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा