25 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरराजकारण‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू

‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू

‘आप’च्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांचे धक्कादायक खुलासे

Google News Follow

Related

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी चांगलीच अडचणीत आली आहे. दिल्ली दारू धोरण घोटाळा, स्वाती मालीवाल प्रकरणांमुळे हा पक्ष चर्चेत आहे. अशातच आता ‘आप’च्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनीही पक्षातील काही बाबींबाबत वाच्यता केली आहे. पक्षाच्या माजी नेत्या शाझिया इल्मी यांनी म्हटले आहे की, स्वाती मालीवाल यांच्यावरील प्राणघातक हल्ला ही एकच घटना नसून आम आदमी पार्टीचे वातावरण हे ‘गैरवर्तन’ आणि ‘गुंडगिरी’चेचं आहे. आप नेत्यांकडे एकमेकांच्या काही ‘फाईल्स’ आहेत आणि त्यावरून ते एकमेकांना ब्लॅकमेल करत असतात, असा खुलासा शाझिया यांनी केला आहे.

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक बिभव कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर, त्यांच्यावर त्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सुरुवातीला आप’कडून हे आरोप मान्य केल्यानंतर आता मात्र, पक्षाने यू-टर्न घेतला आहे आणि भाजपावर आरोप केले आहेत.

दरम्यान, एएनआयशी बोलताना शाझिया इल्मी यांनी सांगितले की, “माझा प्रवास खूप खडतर होता. आम्ही आवेशाने पक्षात आलो पण, इथे वास्तव वेगळेच होते. ‘आप’मधील वातावरण हे गैरव्यवहार आणि गुंडगिरीने भरलेले आहे. ज्या क्षणी तुम्ही मोठा नेता म्हणून उदयास येऊ लागाल तेव्हा तुमचे पंख छाटले जातात. ते अपमान करतात, शिवीगाळ करतात आणि जबरदस्तीने घरात घुसतात,” असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.

पुढे त्या म्हणाल्या की, “मी आरके पुरममधून उमेदवार असताना मला शिवीगाळ करण्यात आली होती. आता आमदार असलेले दुर्गेश पाठक त्रास द्यायचे. सतीश डागर हे आणखी एक होते ज्यांना नगरसेवकाचे तिकीट देण्यात आले होते. त्यांनी मला उघडपणे बोलता येणार नाही अशा शब्दात शिवीगाळ केली. याबाबत तक्रार करण्यासाठी मी अरविंद केजरीवाल यांच्याकडे गेले तेव्हा ते दोघेही मनीष सिसोदिया यांच्यासोबत बसले होते. अरविंद केजरीवाल यांनी माझ्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही आणि माझ्या तक्रारींबाबत मनीष सिसोदिया यांच्याकडे जाण्यास सांगितले. सुरुवातीला मला वाटले की अरविंद केजरीवाल असे नसतील पण त्यादिवशी मी आतून तुटले होते,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आणखी एक आप नेते देवेंद्र ठाकूर यांनी पक्षाच्या एका महिला समर्थकावर हल्ला केला होता, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

“निवडून आल्यानंतर संजय दिना पाटलांचे सगळे काळे धंदे बंद करणार”

निकालाला विलंब होऊ नये म्हणून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ब्राझीलवरून परतताना विमानात तयार केला मसुदा

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई गुणतक्त्यात तळाला

केजरीवाल यांनी न्यायालयात आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करावे

भाजपा नेत्या शाझिया इल्मी यांनी म्हटले की, आपमध्ये ‘ब्लॅकमेल संस्कृती’ आहे. ते एकमेकांना ब्लॅकमेल करतात. १३ मे रोजी स्वाती मालीवाल यांच्यावर केजरीवाल यांच्या निवासस्थानात कथित हल्ला झाल्याच्या घटनेबाबत शाझिया इल्मी म्हणाल्या की, “बिभवने स्वाती मालीवाल यांच्यासोबत जे केले, ते अरविंद केजरीवाल यांच्या परवानगीशिवाय असे कृत्य करू शकत नाही,”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा