अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा

अखिलेश यादव यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यादव व्हीआयपी तामझामात महाकुंभमध्ये दाखल झाल्याचा व्हिडीओ व्हायरल

अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा उघड; महाकुंभसाठी चुलत बंधूना व्हीआयपी सुविधा

उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभवर भाष्य करताना समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव यांनी तेथील व्हीआयपी हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. महाकुंभात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला समान महत्त्व दिले पाहिजे यावर भर देत, अखिलेश यादव यांनी व्हीआयपी हालचालींमुळे होणारी वाहतूक कोंडी प्राधान्याने सोडवावी आणि रस्ते बंद करू नयेत, अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीनंतर आता त्यांचा दुटप्पी चेहरा लोकांसमोर आला आहे.

एकीकडे महाकुंभमधील व्हीआयपी कल्चरवरून उत्तर प्रदेश सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असताना अखिलेश यादव यांचे चुलत बंधू आझमगडचे समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव हे सोमवारी महाकुंभमध्ये स्नान घेण्यासाठी दाखल झाले होते. विशेष म्हणजे धर्मेंद्र यादव हे आपल्या परिवारासह सुरक्षा रक्षकांसोबत दिसत होते. यावेळी धर्मेंद्र यादव म्हणाले की, जर आपण येथील व्यवस्थेबद्दल बोललो तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. काल मी आझमगडहून येत होतो. सहसोहून शहरात पोहोचण्यासाठी सहा तास लागले. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

धर्मेंद्र यादव यांचा बोटीतून संगम स्थान गाठण्याचा बोटीतला त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात ते स्वतः आणि कुटुंबीय बसले असून सोबत आणखी काही व्यक्ती आहेत. तर, पोलीसही दिसून येत आहेत. या व्हिडीओवरून आता धर्मेंद्र यादव आणि अखिलेश यादव यांना लक्ष्य करण्यात येत आहे. एकीकडे व्हीआयपी कल्चरमुळे सामान्य भाविकांची गैरसोय होत असल्याची बोंब अखिलेश यादव ठोकत असताना स्वतःचे बंधू व्हीआयपी कल्चरमध्ये फिरताना दिसत असल्याचे म्हटले जात आहे. अखिलेश यादव यांचा दुटप्पीपणा समोर आल्याचेही बोलले जात आहे. तसेच हा ढोंगीपणा असल्याचीही टीका अखिलेश यादव यांच्यावर केली जात आहे.

हे ही वाचा : 

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सात मुस्लीम तरुण ताब्यात!

कुत्र्यावर खुर्ची उगारणे तरुणाला महाग पडले, एका व्यक्तीने केलेल्या हल्लात अंगठा गमवावा लागला!

गाझियाबादमधील मदरशावर बुलडोझर, २ लाखांचा दंडही ठोठावला!

मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरून देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मागणार

अखिलेश यादव यांनी म्हटले होते की, “संगमला जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने, यात्रेकरूंपेक्षा व्हीआयपी पाहुण्यांना जास्त महत्त्व दिल्यामुळे, भाविकांना महाकुंभ परिसरात पोहोचण्यासाठी मैलभर चालावे लागत आहे. यामुळे वृद्ध, मुले आणि महिलांना प्रचंड गैरसोय, वेदना आणि थकवा सहन करावा लागत आहे. सर्वत्र कोंडीसारखी परिस्थिती आहे. कोंडी त्वरित दूर करावी.”

Exit mobile version