26 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरराजकारणमाविआमधील जागवाटपाच्या धुसपुशीत ठाकरे गटाचे ८० उमेदवार जाहीर, ६५ नंतर आणखी १५...

माविआमधील जागवाटपाच्या धुसपुशीत ठाकरे गटाचे ८० उमेदवार जाहीर, ६५ नंतर आणखी १५ घोषित

दुसऱ्या यादीत १५ नावांची घोषणा

Google News Follow

Related

विधानसभेची निवडणूक राज्यात जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात येत आहे. महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी आपपल्या उमेदवरांची नावे जाहीर केली असून महाविकास आघाडीत मात्र जागावाटपावरून अजूनही धुसपूस सुरू असल्याचे चित्र आहे. अशातच शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर शनिवारी १५ उमेदवारांची घोषणा ‘सामना’मधून करण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडून दुसऱ्या यादीत धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघातील उमेदवरांची घोषणा करण्यात आली आहे.

शिवडीमधून अजय चौधरी, धुळे शहरमधून अनिल गोटे, चोपडामधून राजू तडवी, जळगाव शहरातून जयश्री सुनील महाजन, बुलढाणा येथून जयश्री शेळके, दिग्रसमधून पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोलीमधून रूपाली राजेश पाटील, परतूर येथून आसाराम बोराडे, देवळालीमधून योगेश घोलप, कल्याण पश्चिममधून सचिन बासरे, कल्याण पूर्व येथून धनंजय बोडारे, वडाळामधून श्रद्धा श्रीधर जाधव, भायखळातून मनोज जामसुतकर, श्रीगोंदा येथून अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवलीमधून संदेश भास्कर पारकर यांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले

‘बेकायदा मशिदींविरोधात हिंदूंनी आवाज उठवला तर गृहयुद्ध होईल’

आदित्य ठाकरेंची गडगंज संपत्ती, भातखळकर म्हणाले, वाझे प्रसन्न…

जय गाझा- जय पॅलेस्टाईनवाल्या आव्हाडांवर वेदमंत्रांचा शिडकावा कशासाठी?

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु आहेत. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. यातून अंतर्गत कलहही समोर आला. दरम्यान, ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आता ९०-९०-९० चा फॉर्म्युला ठरला असल्याचे वृत्त आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा