23 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारण... तर आंदोलनाला सामोरं जा

… तर आंदोलनाला सामोरं जा

Google News Follow

Related

“ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गेला. त्यानंतरही विधीमंडळात ३१ जुलै पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरू म्हणणाऱ्या अजित पवारांनी आजपर्यंत आपला शब्द पाळला नाही. आता शेवटचा इशारा,जर ३० सप्टेंबर पर्यंत रिक्त जागा भरल्या नाही तर आंदोलनाला सामोरं जा.” असा इशारा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुलै महिन्यात घडली होती. घरची आर्थिक चणचण, त्यात एमपीएससी परीक्षेचा सावळा गोंधळ या साऱ्या परिस्थितीला कंटाळत स्वप्नीलने आत्महत्येचा मार्ग अवलंबला होता. स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर जवळपास २० लाखांचे कर्ज होते. या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला होता. यावेळी, अशा पद्धतीने दुसरा स्वप्निल लोणकर महाराष्ट्रात होऊ नये याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असंही ते म्हणाले होते.

२०२१ मध्ये एमपीएससीमार्फत घेण्यात आलेली पूर्व परीक्षा देखील स्वप्नील उत्तीर्ण झाला होता. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. स्थापत्य अभियांत्रिकीचा तो पदवीधर होता. मुळचा दौंड तालुक्यातील रहिवाशी असणारा स्वप्निल लोणकर आपल्या कुटुंबासमवेत पुणे येथे येऊन स्थायिक झाला होता. पुण्यातील प्रसिद्ध शनिवार पेठ मध्ये त्याच्या वडिलांचा व्यवसाय होता.

हे ही वाचा:

जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे?

सरसंघचालकांनी घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, गोवर्धन पिठाच्या शंकराचार्यांशीही भेट

लीड्स कसोटीत इंग्लंड मजबूत स्थितीत

प्रतीक कर्पेंचा सरदेसाईंवर पलटवार

स्वप्निलच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तो म्हणाला होता की, “येणाऱ्या प्रत्येक दिवशी फक्त वय आणि कर्जाचा डोंगर वाढत जात आहे आणि आत्मविश्वास लयाला जात आहे. यात तो सेल्फ डाऊट बद्दलही बोलतो. अधिकारी होण्याच्या आशेवर घेतलेले कर्ज, ते वाढत जाऊन त्याचा झालेला डोंगर हा खाजगी नोकरीतून भरून निघू शकत नाही.” असे स्वप्निल या पत्रात सांगतो. तर आपल्याला १०० जीव वाचवायचे होते असेही स्वप्नीलने पत्रात लिहिले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा