26 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरराजकारण…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन

…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन

Google News Follow

Related

शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत  यांना इशारा दिला आहे.

‘शिवप्रसाद’ काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर ‘प्रसाद’ दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल नक्की, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन

ठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय

शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा

महापुर टाळण्यासाठी अलमट्टी, हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा