28 C
Mumbai
Wednesday, December 31, 2025
घरराजकारणअशोक चव्हाण, वडेट्टीवार बहुमत चाचणीला पोहोचलेच नाहीत!

अशोक चव्हाण, वडेट्टीवार बहुमत चाचणीला पोहोचलेच नाहीत!

Google News Follow

Related

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना- भाजपा सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे- फडणवीस सरकारने बाजी मारली आहे. १६४ मतांनी बहुमत सिद्ध करत सभागृहात एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. तर महाविकास आघाडीला यावेळी शंभर मतांची संख्याही गाठता आलेली नाही.

आज सकाळी ११ वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर काही आमदार उशिरा आल्यामुळे त्यांना मतदान करता आलेलं नाही. विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे अशी गैहजर असलेल्या सदस्यांची नावे आहेत. या आमदारांच्या मतांचा फटका महाविकास आघाडीला बसला आणि त्यांना ९९ मतांवर समाधान मानावे लागले.

हे ही वाचा:

शिंदे फडणवीस सरकारने बहुमत चाचणी १६४ मतांनी जिंकली

कर्नाटकची सिनी शेट्टी बनली ‘मिस इंडिया २०२२’

डेन्मार्कमधील मॉलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू

भाजप-शिवसेनेची आज बहुमत चाचणी

बहुमत सिद्ध करण्याची वेळ असताना या आमदारांना उशीर झाला. उशीर झाल्याने दरवाजे बंद करण्यात आले आणि त्यांना प्रवेश नाकारला गेला. इतका महत्त्वाचा दिवस असताना नेत्यांना विधानभवनात यायला उशीर का झाला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आदित्य ठाकरे हे सुद्धा विधानभवनात शेवटच्या क्षणी पोहचले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा