22 C
Mumbai
Friday, January 16, 2026
घरदेश दुनियाट्रम्प म्हणतात, आता मेक्सिको, क्युबा आणि कोलंबियाकडे लक्ष

ट्रम्प म्हणतात, आता मेक्सिको, क्युबा आणि कोलंबियाकडे लक्ष

व्हेनेझुएलाच्या कारवाईनंतर इशारा

Google News Follow

Related

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर आणि एका नाट्यमय व अभूतपूर्व कारवाईत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्यात आल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, मेक्सिको, क्युबा आणि कोलंबिया हे लॅटिन अमेरिकेतील देश पुढील लक्ष्य ठरू शकतात. ट्रम्प यांनी या देशांवर अंमली पदार्थांचे उत्पादन आणि ड्रग कार्टेलना आश्रय देण्याचे आरोप केले आहेत.

मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अमेरिकेने ताब्यात घेतले असून, ट्रम्प यांनी जाहीर केले की, या कारवाईमुळे मादुरो सत्तेवरून हटवले गेले आहेत आणि राजकीय संक्रमणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमेरिका तात्पुरत्या स्वरूपात व्हेनेझुएलाचे प्रशासन चालवेल.

अमेरिकेने या कारवाईचे प्रमुख कारण म्हणून न्यूयॉर्कमधील फेडरल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रांचा उल्लेख केला आहे. या आरोपांनुसार, मादुरो यांनी “नार्को-दहशतवाद” नेटवर्कचे नेतृत्व केले, ज्याद्वारे कोकेन आणि फेंटानिलसह मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अंमली पदार्थ अमेरिकेत पाठवून “अमेरिकन नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा” प्रयत्न केला गेला.

मात्र, व्हेनेझुएलाने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले असून, ही तथाकथित “लष्करी आक्रमण” कारवाई देशाच्या तेल व खनिज संपत्ती लुटण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला आहे

ट्रम्प यांनी “समस्या निर्माण करणाऱ्या शेजारी देशांवर” दबाव वाढवला आहे. क्युबाबाबत बोलताना त्यांनी तो देश “सध्या पूर्णपणे अपयशी राष्ट्र” असल्याचे म्हटले. मेक्सिकोबाबत त्यांनी दावा केला की तेथील ड्रग कार्टेल देश चालवत आहेत आणि “आपल्याला काहीतरी करायलाच हवे,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना हातकड्या घालून अमेरिकेत आणले

तुम्ही कोणता आहार घेता?

कॅल्शियमने भरलेले तीळ हाडांसाठी वरदान

पाकिस्तानात २.६२ कोटी मुले शाळेबाहेर

कोलंबियाबाबत ट्रम्प यांनी तीन मोठ्या कोकेन फॅक्टऱ्या असल्याचा आरोप करत, अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यावरही “कोकेन तयार करण्याचा” आरोप केला. असेच आरोप त्यांनी यापूर्वी व्हेनेझुएलावरही केले होते.

‘ऑपरेशन अब्सोल्यूट रिझॉल्व’ असे नाव देण्यात आलेली ही कारवाई स्थानिक वेळेनुसार पहाटे सुमारे २ वाजता पार पडली. अमेरिकेच्या डेल्टा फोर्सच्या विशेष कमांडोंनी, एफबीआय आणि सीआयएच्या मदतीने, काराकासमधील फोर्ट टिऊना लष्करी संकुलात असलेल्या मादुरो यांच्या निवासस्थानी धडक दिली. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन शनिवारी अमेरिकेत नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर “नार्को-दहशतवाद” संबंधी फेडरल आरोपांचा सामना करावा लागणार आहे.

डाव्या विचारसरणीच्या नेत्याला सत्तेवरून हटवल्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की अमेरिका व्हेनेझुएलाचे प्रशासन चालवेल आणि देशाच्या प्रचंड तेलसाठ्याचा वापर करेल. “आमच्या मंत्रिमंडळातील लोकांना मी जबाबदाऱ्या देत आहे,” असे सांगत ट्रम्प म्हणाले, “आमच्या मोठ्या अमेरिकी तेल कंपन्या अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून मोडकळीस आलेली पायाभूत रचना दुरुस्त करतील. आम्ही मोठ्या प्रमाणात तेल विकणार आहोत.”

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने उपाध्यक्ष डेल्सी रोड्रिग्झ यांची कार्यवाह अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासकीय सातत्य आणि राष्ट्राच्या सर्वांगीण संरक्षणासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

मादुरो यांच्यावर अमेरिकेत नार्को-दहशतवाद कटासह अनेक गंभीर आरोप दाखल असून, ते सोमवारी मॅनहॅटन फेडरल कोर्टात प्रथमच हजर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पत्नीवरही कोकेन आयात कटासह विविध आरोप आहेत.

व्हेनेझुएलाच्या सरकारने या लष्करी आक्रमणाचा तीव्र निषेध केला असून, ही अत्यंत गंभीर बाब असून आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, असे म्हटले आहे. “या हल्ल्याचा उद्देश व्हेनेझुएलाची तेल व खनिज संपत्ती ताब्यात घेण्याचा आहे. देशाची राजकीय स्वायत्तता मोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे, पण तो यशस्वी होणार नाही,” असे सरकारने स्पष्ट केले. मादुरो यांचे संभाव्य उत्तराधिकारी मानले जाणारे उपाध्यक्ष डेल्सी रोड्रिग्झ यांनी या घटनेला “अपहरण” संबोधून अध्यक्षांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली.

या कारवाईदरम्यान अमेरिकन सैन्याने काराकाससह इतर भागांवर बॉम्बहल्ले केले, ज्यामुळे वीजपुरवठा यंत्रणेसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले. व्हेनेझुएलाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री झालेल्या या हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो, ज्यांना गेल्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता, यांनी मादुरो यांच्या अटकेनंतर “स्वातंत्र्याचा क्षण आला आहे” असे म्हटले. मादुरो आता आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर आपल्या गुन्ह्यांसाठी उत्तरदायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाटाघाटींचा मार्ग नाकारल्यानंतर अमेरिकेने कायदा अंमलात आणण्याचे आपले वचन पूर्ण केल्याचेही त्यांनी नमूद केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा