31 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरक्राईमनामातृणमूल नेता छत्रधर महतोला दोन दिवसांची एनआयए कोठडी

तृणमूल नेता छत्रधर महतोला दोन दिवसांची एनआयए कोठडी

Google News Follow

Related

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या केल्यामुळे अटक झालेल्या तृणमूल नेता छत्रधर महतोला दोन दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. कलकत्ता येथील बॅंकशॉल कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. या दोन दिवसांच्या कोठडीत एनआयएला महतोची चौकशी करता येणार आहे.

रविवारी २८ मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून कारवाई करत छत्रधर महतो याला ताब्यात घेतले. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच एनआयएने महतो याला समन्स पाठवले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता प्रबीर महतो याच्या हत्येचा छत्रधर याच्यावर आरोप आहे. २००९ साली या आरोपात त्याला अटकही झाली होती. त्यावेळी छत्रधर महतो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातच होता. पक्षाच्या ‘पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलीस ऍट्रॉसिटीज’ या समितीचा तो संयोजक होता.

हे ही वाचा:

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

२००९ साली बेकायदेशीर क्रिया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) महतोला अटक करण्यात आली होती. पण या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तो तुरुंगातून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याला तृणमूल काँग्रेसमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. छत्रधर हा तृणमूल पक्षासाठी अत्यंत महत्वाचे नाव असून जंगलमहल भागात पक्षाला यश मिळवून देण्यासाठी त्याची भूमिका महत्वाची असणार आहे. पण शनिवार २७ मार्च रोजी पश्चिम बंगाल निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर लगेचच रविवारी महतोला अटक केली.

अटकेनंतर छत्रधर महतोला एनआयएने कलकत्ता येथील न्यायालयात हजर केले. यावेळी निकाल देताना न्यायालयाने महतोला दोन दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. दोन दिवसानंतर महतोला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यावेळी न्यायालयाकडून पुढील आदेश देण्यात येईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा