25 C
Mumbai
Wednesday, December 31, 2025
घरराजकारणरोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!

रोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा टोलवला नामकरणाचा मुद्दा

औरंगाबादचे नाव संभाजीनगर तेव्हाच करेन जेव्हा ते संभाजी महाराजांना आदर्श वाटेल, अभिमानास्पद वाटेल. नाहीतर नाव बदलायला काय, आता मी बदलू शकतो. पण नाव बदललं आणि पाणी दिलं नाही, रस्ते दिले नाहीत, रोजीरोटी दिली नाही तर कसे होईल? संभाजी महाराज टकमक टोकावर दाखवतील, असे म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा टोलवला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे नाव बदलण्याचे वचन दिले होते आणि ते मी विसरलेलो नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले पण हे नामकरण कधी होणार याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही.

छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचा प्रस्ताव विधानसभेत संमत झालेला आहे आणि तो केंद्राकडे पाठवला आहे. तो मंजूर करून आणा असे त्यांनी राज्यातील भाजपाला सांगत पुन्हा एकदा केंद्रावर जबाबदारी ढकलली.

संभाजीनगरातील या सभेचा उद्धव ठाकरे यांचा सूर हा फक्त भाजपाविरोधाचाच होता.

संभाजीनगरमध्ये बिकट झालेल्या पाणीप्रश्नापासून त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यात भाजपाचा जलआक्रोश मोर्चा हा सत्तेसाठी भाजपाने काढला असे म्हणत पाणीप्रश्नाची धार कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आधी पाच वर्षे तुम्ही सत्तेत होतात आम्हीही सोबत होतो का भूमिपूजन केले नाही, पाण्याच्या योजनांचे असे ते भाजपाला उद्देशून म्हणाले.

पाणीप्रश्नावरून भाजपाने रान उठवल्यानंतर आणि या पाणीप्रश्नावरून संभाजीनगरातील नागरीक प्रचंड त्रस्त झाल्याचे दिसत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किती काळ आम्ही हुलकावणी देत बसणार अशी स्पष्ट कबुलीही दिली. पालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देत दंडा घ्या आणि वाकडे येतील त्यांना सरळ करा आणि योजना पूर्ण करा, अशी कळकळीची विनंती केली. संभाजीनगरात शिवसेनेची गेली अनेक वर्षे सत्ता आहे. पण इथे पाणी आठ दिवसांनी मिळत असल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशच्या शाळेमध्ये मराठी शिकवली जाणार?

सिद्धू मुसेवाला प्रकरणी, पुण्यातून सौरभ महाकाळला अटक

ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

बारावीत पुन्हा मुलीच अव्वल; ९४ टक्के निकाल

 

ज्याला प्रशासनाचा अनुभव नाही तो मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला पुढे नेत आहे. ही वाटचाल सोपी नव्हती आणि नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळविले ज्यांच्याशी याआधी लढत होतो. २५ वर्षे ज्यांच्याशी मैत्री होती ते उरावर बसायला लागले. मित्र हाडवैरी झाला व वैरी होते ते मित्र झालेत. असे म्हणत आपल्या वैरी पक्षांशी हातमिळवणी केल्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

इतर मुद्दे उपस्थित करताना ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, बाबरी मशीद पाडण्याची घटना, त्यातील देवेंद्र फडणवीसांचा सहभाग, कोर्टाने आदेश दिले त्यामुळे मंदिर उभे राहिले, काश्मिरी पंडितांच्या हत्या अशा मुद्द्यांचा नेहमीचाच उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

आज जे काश्मीरमध्ये चालले आहे त्यात असाच एक सैनिक होता. तो देशाकडून लढत होता. अनेक शत्रू मारले. त्याचे अपहरण केलं. एकेदिवशी छिन्नविछिन्न मृतदेह सापडला. कोण होता तो औरंगजेब. देशासाठी शहीद झाला. तो मुसलमान होता, देशासाठी मरायला तयार आहे तो आमचा आहे. हे आमचे हिंदुत्व आहे. जी कामे आपण केलेली आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.

यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले की, जे मित्र होते ते वैरी झाले हे खरे आहे, पण मित्र नव्हते त्यांच्या पायाशी बसून लाचार सेनेला पाय चेपायची वेळ आली हे जास्त खरं आहे. अडीच वर्षांपूर्वी काडीचाही अनुभव नसलेली व्यक्ती गेली अडीच वर्षे सतत घरी बसल्यामुळे अनुभवाच्या बाबतीत तिथेच आहे, हे जनता पाहतेच आहे. फडणवीस सरकारने केलेल्या कामांना आपल्या नावाच्या पाट्या लावायचा एवढाच विकास जनता पाहतेय.

कलाम आणि कसाब मधला फरक कळण्याएवढी या देशाची जनता सुज्ञ आहे. तो काश्मीरचा भारतमातेचा सुपुत्र औरंगजेब वेगळा आणि आज तुम्ही ज्या औरंगाबादेत थापा मारत आहात तो औरंगजेब वेगळा.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा