27 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणकनफ्युजन ही कनफ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही

कनफ्युजन ही कनफ्युजन है, सोल्युशन कुछ पता नही

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी लॉकडाऊन या शब्दाचा उल्लेख न करता महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केला. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस असे काहीतरी महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल, अशी अपेक्षा असताना फुटकळ आश्वासनांपलिकडे फारसे काही पदरी पडले नाही. एकीकडे महाराष्ट्रातील सुविधा अपुऱ्या आहेत, अशी नेहमीची तक्रार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या मागण्यांच्या यादीवरच मुख्यमंत्र्यांनी भर दिला. एकूणच आतापर्यंतच्या फेसबुक लाइव्हमध्ये झालेला केंद्राकडे बोट दाखविण्याचा कार्यक्रमच यावेळीही मुख्यमंत्र्यांनी केल्याचे दिसले. आपल्याकडे तूर्तास कोणतीही ठोस उपाययोजना नाही, असाच या भाषणाचा सूर होता. संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होईल, अशी शक्यता होती, पण तशी स्पष्ट घोषणा न करता मागल्या दाराने लॉकडाऊन करण्याची पळवाट शोधण्यात आली. मुख्यमंत्रयांच्या याच भाषणावर अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ विलगीकरणात

फुटकळ पॅकेज देऊन मागील दाराने लॉकडाउन

हा तर ठाकरे सरकारच्या अपयशाचा उद्रेक

आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी

काय म्हणाले भातखळकर?
मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण म्हणजे सर्वांना गोंधळात टाकणारे आहे. मागल्या दाराने आणलेला हा लॉकडाऊन आहे. पोपट मेलाय असे थेट न म्हणता, पोपट बोलत नाहीये, पोपट खात नाहीये, पोपट हालचाल करत नाहीये एवढेच म्हणणे त्यांनी बाकी ठेवले आहे. अशी सणसणीत चपराक भातखळकरांनी लगावली आहे. केंद्र सरकारकडे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागण्या आधीच केल्या असत्या तर त्या पूर्ण झाल्या असत्या. पण केंद्राची सगळी मदत मिळत असताना केंद्राच्या नावाने बोंबाबोंब केल्यानंतर पुन्हा कोणत्या तोंडाने मदत मागायची ही अडचण असल्यामुळे त्यांनी लोकसांसमोर उद्या पत्र लिहीन वगरे सांगितले.

घोषणा फसव्या
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केलेल्या घोषणा संपूर्ण फसव्या आणि तोंडाला पाने पुसणाऱ्या आहेत असा घणाघात भातखळकरांनी केला आहे. शेतकरी आणि अन्य लोकांचे काय याबद्दल त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही. त्यासोबतच केलेल्या घोषणा कधीपर्यंत पूर्ण होणार याविषयीही ते बोलले नाहीत असे म्हणताना मुख्यमंत्र्यांनी जनतेची निराशा केली आहे असे अतुल भातखळकर म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा