माजी भारतीय लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या अद्याप अप्रकाशित आत्मचरित्रामुळे संसदेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. हे पुस्तक नेमके कसे आहे आणि त्यात असे काय आहे, ज्यामुळे लोकसभेत गदारोळ माजला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारवां मासिकात छापुन आलेल्या माहिनीनुसार डोकलाम या ठिकाणी चीनी रणगाडे आणि भारतीय रणगाडे समोरासमोर आले होते. यावेळी घटनेच्या वेळी जनरल नरवणे यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला पहिल्यांदा त्यांनी उचलला नाही, नंतर पुन्हा त्यांनी फोन उचलला आणि यावेळी जनरल नरवणे यांनी परिस्थितीची माहिती त्यांना दिली होती. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी “थोड्यावेळात फोन करतो” असे सांगितल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. त्यानंतर रात्री सुमारे १०.३० वाजता राजनाथ सिंह यांनी पुन्हा जनरल नरवणे यांना फोन करून, “तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या,” असे सांगितल्याचे आत्मचरित्रात नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
ठाकूर-जायसवाल पुनरागमनाने मुंबई सज्ज!
शेख हसीना यांना गृहनिर्माण घोटाळ्यात १० वर्षांची शिक्षा
मास्टर सदानंदन यांनी सांगितली, कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांनी पाय कापल्याची करुण कहाणी
मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरातील ट्रक्सच्या त्रासावर पोलिसांनी उगारला दंडुका
मिळालेल्या माहितीनुसार, या आत्मचरित्रात जनरल नरवणे यांच्या सेवाकाळातील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील घटनांचा उल्लेख आहे. विशेषतः भारत–चीन सीमावाद, डोकलाम संघर्ष, लडाखमधील तणावपूर्ण परिस्थिती तसेच लष्करप्रमुख म्हणून घेतलेल्या निर्णयांची अंतर्गत पार्श्वभूमी या पुस्तकात मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. चीनकडून भारतीय हद्दीजवळ लष्करी हालचाली वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि लष्कर पातळीवर झालेल्या चर्चांचाही उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.
लोकसभेत राहुल गांधी यांनी या कथित मजकुराचा संदर्भ देत सरकारला थेट प्रश्न विचारले. चीनच्या घुसखोरीबाबत देशाला संपूर्ण सत्य सांगण्यात आले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, हे पुस्तक अद्याप अधिकृतपणे प्रकाशित झालेले नसून संरक्षण मंत्रालयाची मंजुरीही मिळालेली नाही, याकडे सत्ताधारी पक्षाने लक्ष वेधत आक्षेप घेतला.
यावर प्रतिक्रिया देताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबी असलेल्या अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख करणे हे संसदीय नियमांच्या विरोधात आहे. अशा स्वरूपाचा संवेदनशील मजकूर सार्वजनिक झाल्यास देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
महत्त्वाचे म्हणजे, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आत्मचरित्रांना प्रकाशनापूर्वी संरक्षण मंत्रालयाची तपासणी आणि अधिकृत मंजुरी आवश्यक असते. नरवणे यांच्या आत्मचरित्रातील काही मुद्दे अत्यंत संवेदनशील असल्यामुळेच या पुस्तकाच्या प्रकाशनाला विलंब होत असल्याचे मानले जात आहे.







