33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरराजकारणदीपस्तंभावर दिवा लावण्याच्या विरोधात विजय सरकार

दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या विरोधात विजय सरकार

न्यायालयात धाव, भाजपेतर पक्षांचा पाठींबा

Google News Follow

तामिळनाडूतील मदुराई येथील थिरुपरनकुंद्रम टेकडीवरील दीपस्तंभाच्या वादावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने कार्तिगाई दीपम उत्सवानिमित्त २४ नोव्हेंबरला टेकडीवरील वादग्रस्त दीपस्तंभावर दिवा लावण्यास एकदाच अंतरिम परवानगी दिली होती. मात्र, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (TVK) सरकारने या निर्णयाविरोधात २१ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. सरकारच्या या भूमिकेला भाजप वगळता राज्यातील बहुतांश राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका केली. “दीपस्तंभावर दिवा लावण्यास सांगितल्यावर सरकार इतके का अस्वस्थ झाले आहे? कार्तिक दीपमच्या दिवशी थिरुपरनकुंद्रम येथील दीपस्तंभावर दिवा लावण्यास परवानगी देणाऱ्या आपल्या आदेशाचा फेरविचार करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सरकारच्या या हिंदुत्वविरोधी भूमिकेचा मी तीव्र निषेध करतो,” असे ते म्हणाले.

द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी धार्मिक सलोखा आणि शांतता राखण्याची भूमिका मांडली. काँग्रेसचे खासदार बी. माणिकम टागोर यांनी सरकारच्या पुनर्विचार याचिकेला पूर्ण पाठिंबा दिला. एमडीएमके, व्हीसीके, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि द्रविडर कळघम यांनीही सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. मात्र, अण्णाद्रमुकचे प्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले नाही. हा अंतिम निकाल नसून अंतरिम आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

केरळमध्ये ११.६ किलो गांजासह युवक काँग्रेस कार्यकर्त्याला अटक

चीनकडून बांगलादेशला क्षेपणास्त्र निर्मितीचा कच्चा माल?

ना विसावा, ना थांबा… अमूर फाल्कनने सलग १०१ तासांत गाठला सोमालियाचा किनारा

आशियातील भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्यावर शिक्कामोर्तब

नेमका वाद काय?

थिरुपरनकुंद्रम टेकडीवरील मंदिराजवळ असलेल्या दर्ग्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर हा दगडी स्तंभ आहे. हिंदू संघटनांची या ठिकाणी कार्तिगाई दीपम प्रज्वलित करण्याची मागणी आहे. मात्र, सरकारच्या म्हणण्यानुसार परंपरेने टेकडीवरील उचीपिल्लयार मंदिराजवळील दीप मंडपात दिवा लावला जातो. सर्वोच्च न्यायालयाने यंदा केवळ एकदाच दिवा लावण्याची परवानगी दिली असून, सर्वसामान्य नागरिक, मिरवणुका आणि निदर्शनांना मनाई केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी २०२७ मध्ये होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा