32 C
Mumbai
Monday, June 1, 2026
घरराजकारण“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे”

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे”

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्तुतिसुमने

Google News Follow

Related

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं विधान केलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “एका माजी मुख्यमंत्र्यांच्या १२५ व्या जयंतीला जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले आहेत ही मोठी गोष्ट आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी ते आले आहेत, हा मोठेपणा असतो. खरं तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून आम्ही कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे पाहायचो आणि ते नंतर मुख्यमंत्री देखील झाले. आता तुमच्याकडे कर्तुत्व आहे, कार्य करण्याची क्षमता आणि हिमंत आहे. त्यामुळे आता तुम्ही (देवेंद्र फडणवीस) सुद्धा नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावं,” असं विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं.

मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री काळात मोठं काम केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची सुरुवात त्यांच्याकडून झाली. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री तेच झाले होते. त्यांनी विकासाची पायाभरणी केली, या विकासाचे कळस म्हणून देवेंद्र फडणवीस हे काम करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, असं कौतुकही विजय वडेट्टीवार यांनी केले.

हे ही वाचा : 

हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित

मुस्लिमांना महाकुंभात येऊन दुकान मांडता येईल का?

वणवा घरापर्यंत पोहोचला, पण आपले घर त्यांनी सोडले नाही!

महाकुंभ मेळाव्यानिमित्त आकाशवाणीकडून ‘कुंभवाणी’

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला माहिती आहे की हा जिल्हा वाघ आणि ‘वारां’चा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार हे आमचे नेते आहेत, तसेच विजय वडेट्टीवार आणि किशोर जोरगेवार हे आमचे मित्र आहेत. त्यामुळे मी सांगतो की कुठलेही ‘वार’ असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. कारण आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे ‘वार’ हे आडनाव आल्याबरोबर आमचे हात नेहमी पुढे असतात.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा