26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरराजकारणआम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही

आम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सज्जड दम

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्हॉट्सऍप चॅटवरून टीका केली आहे. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही परिवार बचाओ बैठक होती, अशी टीका देवेंद्र फडवणीस यांनी विरोधकांवर केली होती. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे.” यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंना चपराक लगावली आहे. “आम्ही घरात घुसत नाही, घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

“मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “ज्या व्हॉट्सऍप चॅट बाबत तुम्ही बोलत आहात ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत कारण, त्यात लपविण्यासारखे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी बालबुद्धी असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका,” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

उद्धव ठाकरेंना चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर त्यांनी खुशाल काढावे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विषयांची यादीचं दिली आहे. “सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले; मुंबईला कुणी लुटले?, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले?, मराठी माणसाला कुणी ओरबाडले?, १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते?” अशा विषयांवर उद्धव ठाकरेंनी पुस्तकं काढावीत असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे म्हणतात मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी मुद्दाम बसलो

जामिनासाठी रचला बनाव; पत्नीला मेंदूचा आजार पण दाखविली हाडाची शस्त्रक्रिया!

अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना

सगळ्या विमान कंपन्यांना हवेत गुणवत्तावान वैमानिक; वाढणार घसघशीत पगार

“उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व आणि त्यांचे कारनामे एकेक करत जनतेसमोर उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. तोवर उद्धव ठाकरेंची हास्यजत्रा चालू द्या. पुढे बघूच शवासन कुणाला करावे लागते ते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा