27.9 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरराजकारणफडणवीसांनी पोलखोलचं केली; अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकं झालेलं काय?

फडणवीसांनी पोलखोलचं केली; अमित शाह, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकं झालेलं काय?

उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाल्याची देवेंद्र फडणवीसांची टीका

Google News Follow

भाजपा आणि शिवसेना यांच्यात ‘मातोश्री’मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेचा मुद्दा वारंवार चर्चेत येत असतो. भाजपाने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते मात्र, नंतर ते पाळले नाही, असा दावा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे वारंवार करत असतात. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला, असं सांगितलं जात. तर, दुसरीकडे भाजपाकडून हा दावा वारंवार फेटाळला जातो. त्या बैठकीत नेमके काय झाले होते याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याचा उलगडा केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समजा उद्धव ठाकरे म्हणतात तसं जरी ठरलं असेल की अडीच वर्ष आधी मी आणि नंतर ते तर त्यांनी फोन का उचलला नाही. चर्चा का केली नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

तेव्हाची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपा यांच्यात चर्चा सुरु असताना शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी झाली. तेव्हा वरिष्ठांना विचारुन निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांना प्राथमिक चर्चेत सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर रात्री १ वाजता अमित शाह यांना फोन करुन हा विषय सांगितला. त्यांनी मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार दिला. हवे असल्यास जागा वाटपात आणि मंत्रीपदात तडजोड करता येईल, असे सांगितले. पुढे अमित शाह यांचा निरोप उद्धव ठाकरे यांना दिला आणि चर्चा थांबली, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा मध्यस्थामार्फत चर्चा सुरु करण्याची मागणी आली त्यावेळी त्यांनी विधान परिषदेतील जागा, मंत्रीपदे या मागण्या केल्या. शिवाय अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन चर्चा करण्याची मागणी केली. मनातील गोष्टी करायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे अमित शाह मातोश्रीवर येण्यास तयार झाले. पण मुख्यमंत्रीपद देणार नाही, हे पुन्हा स्पष्ट करण्यास सांगितले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

‘मीडियातले पत्रकार स्वतःच्या विचारसरणीचा प्रचार करत आहेत!’

कोकण रेल्वे आता बोरिवलीवरून सुटणार

“उद्धव ठाकरे जे पांचट जोक, टोमणे मारतात, ते शोभणारे नाही!”

एमडीएच, एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर नेपाळकडून बंदी

१८ फेब्रुवारी २०१९ रोजी ती बैठक झाली. चर्चेनंतर अमित शाह यांनी बोलवले. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांना असे वाटू नये की मी यू-टर्न घेतला आहे. म्हणून तुम्हीच या पद्धतीने पत्रकार परिषदेत बोला. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत काय बोलावे, याचा सराव झाला. तो त्यांनी मान्य केला. शेवटी पत्रकार परिषदेत मीच बोललो. अमित शाह आणि उद्धव ठाकरे एक, एक वाक्यच बोलले, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, आता उद्धव ठाकरे बाळासाहेब आणि भावानी मातेची शपथ घेऊन खोटे बोलतायत. ते भ्रमिष्ट झाले असणार, असं वाटतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा