28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरराजकारणमाहितीच्या अधिकारात आमदार साटम यांना काय सापडले?

माहितीच्या अधिकारात आमदार साटम यांना काय सापडले?

Google News Follow

भाजपा आमदार अमित साटम यांनी मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. साटम यांनी माहिती अधिकारातील कागदपत्रांच्या आधारे याबाबतची विदारक वस्तुस्थिती समोर आणली आहे.

गेली दोन दशकं मुंबईनं रस्त्यावरचे खड्डे, रस्तेदुरुस्ती यांवर केलेला हा खर्च एखाददुसऱ्या लहान शहराच्या महापालिकेचं बजेटही असू शकला असता. मात्र रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर हजारो कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांची अवस्था जैसे थेच आहे, अशी टीका साटम यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेने रस्ते, अंतर रस्ते आणि खड्डे दुरुस्तीवर गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटींचा खर्च केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे एखाद्या पालिकेच्या बजेटएवढा हा पैसा खर्च करूनही खड्डे आणि रस्त्यांची परिस्थिती जैसे थे असून दरवर्षी त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद करावी लागत असल्याचं उघड झालं आहे.

माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. गेली २४ वर्षे म्हणजे १९९७ पासून महापालिकेने नवे आंतररस्ते, खड्डे आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी २१ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या २४ वर्षात सर्वात जास्त खर्च २०१४- १५ मध्ये झाला. या वर्षी ३२०१ कोटी रुपये रस्ते कामांवर खर्च करण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २०१५ मध्ये ३४ रस्ते दुरुस्तींतील घोटाळाही चांगलाच चर्चेत राहीला होता. त्यामुळे पालिका प्रशासन आणि शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली होती. २००२- ०३ मध्ये सर्वात कमी ८०.५ कोटींचा खर्च झाला.

हे ही वाचा:

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीस साताऱ्यात

१० खासदाराचं निलंबन होणार? कारण काय?

रिझर्व्ह बँकेची आता ‘या’ बँकवर मोठी कारवाई

लाज वाटली पाहिजे या मंत्र्याला आणि ठाकरे सरकारला

तुमच्या आमच्या कराचे पैसे सत्ताधाऱ्यांच्या टोळीने २१ हजार कोटी रुपये खड्ड्यात घातले. त्यामुळे मुंबई शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न मुंबईकरांना पडलेला असतो. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते मात्र मुंबईत नाहीत. पालिकेने हे पैसे खड्ड्यात घातले आहेत. हा भ्रष्टाचार आणि वाझेगिरी करणारे कोण आहेत? हा माझा सवाल आहे, असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा