29 C
Mumbai
Tuesday, March 17, 2026
घरराजकारणसुप्रिया सुळेंवर मराठा आंदोलकांनी बाटल्या भिरकावल्या!

सुप्रिया सुळेंवर मराठा आंदोलकांनी बाटल्या भिरकावल्या!

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर गेल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून अनेक नेते, आमदार मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनीही तीच संधी साधली. पण आज वेगळाच अनुभव सुप्रिया सुळेंना यांना घ्यावा लागला. आपण असतो तर मराठा आरक्षण अगदी सोप्या पद्धतीने मिळवून दिले असते असा दावा सुप्रिया सुळे यांनी नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्याने पत्रकारांशी बोलताना केला. पण त्याआधी त्या जेव्हा मंचावर गेल्या तेव्हा मनोज जरांगे चक्क गोधडीत घोरत पडलेले होते.

त्यामुळे काही मिनिटे सुप्रिया सुळे मराठा आंदोलक किंवा जरांगे यांचे जवळचे कार्यकर्ते यांच्याशी अघळपघळ चर्चा करत बसल्या. मीडियाचे कॅमेरेही सुप्रिया सुळे यांचा वेध घेत होते. पण जरांगे मात्र उठण्याचे नावच घेत नव्हते. एरवी भेटीसाठी येणाऱ्या आमदार खासदारांशी संवाद साधणारे, त्यांना सल्ले देणारे जरांगे गोधडीतच पडून राहिले होते. त्यानंतर थोड्यावेळाने त्यांनी डोळे किलकिले केले आणि मग सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. मात्र ते उठून बसले नाहीत कि त्यांनी अगदी आदराने सुप्रिया सुळेंची विचारपूसही केली नाही. जरांगेंना कानमंत्र दिल्यानंतर सुप्रिया सुळे निघाल्या. मात्र जातानाची त्यांची वाट सोपी राहिलेली नव्हती. त्यांनी गाडीकडे येताना हसत हसत सगळ्या आंदोलकांना हात हलवून अभिवादन केले, एका आंदोलकाचं कौतुकही केले. मात्र गाडीत बसल्यावर त्यांच्या गाडीला आंदोलकांनी घेराव घातला. काचा लावलेल्या असतानाही आंदोलक घोषणाबाजी करत होते आणि सुप्रिया सुळेंना काहीतरी काचेतून सांगण्याचा प्रयत्न करत होते. पवारांनी आमचं वाटोळं केलं असे आंदोलक बोलत होते. गाडी पुढे जाण्याचे नाव घेत नव्हती. शेवटी कशीबशी गाडी पुढे सरकली. तेव्हा मराठा आंदोलकांकडून गाडीवर बाटल्या फेकण्यात आल्या. या बाटल्या नेमक्या का फेकल्या, सुप्रिया सुळे की शरद पवार यांच्यावर आंदोलकांचा राग आहे का, कशामुळे राग आहे असे अनेक प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाले.

हे ही वाचा:

ईडीने आरोपी अमित अग्रवालला केली अटक

अमित शाह यांनी भद्रकाली मंदिरात केली पूजा

मोदी म्हणाले, अभिमानाने बोला, हे स्वदेशी आहे

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटात दोन ठार

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मागे शरद पवारांनी भेट दिली होती. तेव्हाही पवारांविरोधात काही लोकांनी घोषणाबाजी केली होती. याची आठवण यानिमित्ताने आली. आता या घेरावानंतर सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी काही कर्मचारी सिल्व्हर ओकवर धावून आले होते, हे तुम्हाला आठवत असेल. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. सुप्रिया सुळे त्यांना गयावया करताना दिसल्या होत्या. त्या आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते, याची आठवणही यानिमित्ताने आल्यावाचून राहात नाही.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी आंदोलकांना खडसावले की, जे लोक इथे भेटायला येतील त्यांना सन्मान द्या. सुप्रिया सुळे यांच्या गाडीला घेराव घातल्यानंतर जरांगे यांनी या सूचना केल्या. जर अशी वागणूक दिली तर नेते इथे येणार नाहीत, असेही ते म्हणाले. पण त्याचवेळी जरांगे हे मात्र फडणवीसांबद्दल जे शब्दप्रयोग करतात, त्यातून कोणता सन्मान होतो, असाही सवाल उपस्थित झाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा