25 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरराजकारणसर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेणार!

सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेणार!

गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची गटनेता निवडीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी एकमताने निवड केली. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी अनुमोदन दिले. यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आलेले विजय रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होताच विधिमंडळात ‘देवाभाऊ’च्या घोषणा देण्यात आल्या.

देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच आमदारांना संबोधित करत असताना एक है तो सेफ है असा नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले आणि मित्रपक्षांचे त्यांनी आभार मानले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या संविधानाने ही प्रक्रिया दिली. ते संविधान कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा मोठं आहे, असं मोदीजी म्हणतात. त्यानुसारच आपल्याला राज्याचा कारभार पुढे न्यायचा आहे.

“जनदेशाचा आनंद आहेच. जबाबदारीची जाणीव करुन देणारा हा जनादेश आहे. लोकांचा सन्मान राखण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आपण सुरु केलेल्या योजना आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करणं, ही प्राथमिकता असणार आहे. सर्व आघाड्यांवर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. २०१९ साली जनतेने आपल्याला कौल दिला होता. परंतु दुर्दैवाने तो कौल हिसकावून घेण्यात आला. जनतेसोबतही बेईमानी झाली. २०२२ साली आपलं सरकार स्थापन झालं. आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत त्यामुळे मिळालं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्यासारख्या बूथ कार्यकर्त्याला नरेंद्र मोदी यांनी तीनवेळी संधी दिली. एकदा ७२ तासांसाठीच होतो. परंतु टेक्निकली मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीनवेळी मला संधी दिली त्यांचे मी आभार मानतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस झाले गटनेते; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार

विरोधक देशविरोधी कारवाया करत आहेत… दक्षिण कोरियात गोंधळ

अल्लू अर्जुनच्या पुष्पा-२ला ऍडव्हान्स बुकिंगमधून मिळाले १०० कोटी

महायुती सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रातील मंत्री आणि दिग्गज नेते तसेच विविध राज्यातील मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा